शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संकटं संपता संपेना! अंगावर काळे चट्टे पडून होतोय मृत्यू; 'या' रहस्यमयी आजाराचे थैमान, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:23 IST

Starts with black bite ends in death scrub typhus mystery fever : अंगावर काळे चट्टे पडतात आणि नंतर मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. प

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराने थैमान घातले आहे. यामध्ये अंगावर काळे चट्टे पडतात आणि नंतर मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पश्चिम उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यात  गेल्या काही दिवसांपासून स्क्रब टायफस (Scrub Typhus) या रहस्यमयी रोगाची दहशत निर्माण झाली आहे. 

स्क्रब टायफसची माहिती मिळताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून आता गावागावांमध्ये जाऊन लोकांची तपासणी सुरू झाली आहे. आतापर्यंत 12 जणांना स्क्रब टायफसची बाधा झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आसामच्या गुवाहाटी येथे एका कोविड सेंटरमधील लोकांना स्क्रब टायफसची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे कोविड सेंटर बंद करण्याची वेळ ओढावली होती. या सेंटरमध्ये तब्बल 29 जणांना स्क्रब टायफसची बाधा झाली होती. कोविड सेंटरमधील डॉक्टर्स आणि कर्मचारीही स्क्रब टायफसच्या विळख्यातून सुटले नव्हते. 

काय आहे स्क्रब टायफस?

स्क्रब टायफस हा आजार ओरियेंटिया सुटसुगमुशी नावाच्या जीवाणुमुळे होतो. संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे. तसेच लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

स्क्रब टायफसची लक्षणं काय?

स्क्रब टायफसच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा समावेश आहे. तसेच रोगाची लागण झाल्यास तुमच्या अंगावर काळे चट्टे उठतात. अनेकांच्या अंगावर सूज येण्याचीही शक्यता आहे.

स्क्रब टायफस या रोगावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव यापासून स्वत:चा बचाव करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूHealthआरोग्य