शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

हलवा सेरेमनी अर्थसंकल्प निर्मितीचा प्रारंभीचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 17:09 IST

अर्थसंकल्पाबाबत अनेक विशेष घटना किंवा वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असतात. बजेट मांडण्यापूर्वी खुद्द अर्थमंत्री एका कढईतून अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटत आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध होतात.

नवी दिल्ली- अर्थसंकल्पाबाबत अनेक विशेष घटना किंवा वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असतात. बजेट मांडण्यापूर्वी खुद्द अर्थमंत्री एका कढईतून अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटत आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध होतात. त्याला ''हलवा सेरेमनी"(हलवा वाटण्याचा कार्यक्रम) असे नावच पडून गेले आहे. वर्षांमागून वर्षे गेली तरी हा कार्यक्रम आजही साजरा केला जातो. हा कार्यक्रम साजरा करण्यामागेही एक महत्त्वाचे कारण आहे.अर्थसंकल्पाची निर्मिती ही भारतामध्ये अत्यंत गोपनीय बाब समजली जाते आणि अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण होईपर्यंत त्यातील माहिती बाहेर समजू नये याची काळजी घेतली जाते. या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या दिवशी एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो आणि तो अर्थमंत्रालयातील संबंधिक कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जातो. या कार्यक्रमाला स्वतः अर्थमंत्री उपस्थित राहातात. तसेच अर्थराज्यमंत्रीही यावेळेस उपस्थित राहातात. हा कार्यक्रम संपल्यावर साधारणतः 100 कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये जातात.साधारणतः दहा दिवस अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया सुरु असते. या काळामध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबीय, मित्र, नातेवाईंकांशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही. त्यांना नॉर्थ ब्लॉकमध्येच राहावे लागते. तसेच मोबाईल, इ-मेल अशा कोणत्याही माध्यमाचा त्यांना वापर करता येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या सर्व हालचालींवर अधिकाऱ्यांचे निरीक्षण असते. नॉर्थ ब्लॉकमध्ये अत्यंत चांगल्या क्षमतेचा मोबाइल जॅमर बसवल्यामुळे कोणतीही माहिती मोबाइलवरुन बाहेर जाऊ शकत नाही.अर्थसंकल्पाची निर्मिती झाल्यावरही मुद्रित अर्थसंकल्प अत्यंत कडेकोट बंदोबस्तात संसदेत आणला जातो. त्यासाठी संरक्षणाच्या उपाययोजना केलेल्या असतात. हलवा वाटप कार्यक्रम या सर्व प्रक्रियेचा प्रारंभ झाला असे घोषित करण्यासाठी केला जातो. त्यामुळेच अर्थसंकल्प निर्मितीसारख्या महत्त्वाच्या कामामध्ये या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBudget 2018अर्थसंकल्प २०१८Budget 2018 Highlightsबजेट 2018 संक्षिप्त