कुडचडे येथे कार्निव्हालला प्रारंभ
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:56+5:302015-02-14T23:50:56+5:30
कॉपी आहे, पाहावी

कुडचडे येथे कार्निव्हालला प्रारंभ
क पी आहे, पाहावीसावर्डे : कुडचडे येथील सेत्रो सोशिअल आंजो कुस्तिदियो क्लब, गोवा पर्यटन खाते व कुडचडे-काकोडा नगर पालिकेतर्फे कार्निव्हल कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. यानिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत. कुडचडे येथील सेत्रो सोशिअल आंजो कुस्तिदियो क्लबतर्फे गोवा पर्यटन खाते, कुडचडे-काकोडा नगरपालिका यांच्या सहकार्याने यंदाच्या कार्निव्हलनिमित्त दि. १३ ते १७ पर्यंत कुडचडे-काकोडा पालिका क्षेत्र, शेल्डे पंचायत क्षेत्र व असोल्डा पालिका क्षेत्र येथे दरदिवशी विविध प्रकारचे खेळ, तियात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलचा प्रमुख कार्यक्रम दि. १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वा. कुडचडे बाजारातून खास चित्ररथ मिरवणुकीने साजरा करण्यात येणार आहे. ही मिरवणूक सावर्डे-कुडचडे रेल्वे स्थानकापासून सुरू होणार असून कुडचडे बाजारातून ती कदंब बसस्थानकापर्यंत जाणार आहे. त्यानंतर तेथे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने मिरवणुकीची सांगता होणार आहे. ही चित्ररथ मिरवणूक पारंपरिक विभाग, क्लब व सामाजिक संस्था विभाग, फन जंक विभाग, फॅमिली विभाग व क्लोन जोकर अशा विविध प्रकारांत होणार आहे. पारंपरिक विभागासाठी पहिले बक्षीस रु. ७५ हजार, दुसरे बक्षीस रु. ६० हजार, तिसरे बक्षीस रु. ४५ हजार, चौथे रु. ३० हजार, पाचवे रु. १५ हजार व उत्तेजनार्थ रु. ५ हजार अशी रोख बक्षिसे ठेवली आहेत. क्लब गटासाठी पहिले रु. ५० हजार, दुसरे रु. ४० हजार, तिसरे रु. ३० हजार, चौथे रु. २० हजार, पाचवे रु. १२ हजार व उत्तेजनार्थ रु. ४ हजार. घन जॅकसाठी पहिले रु. २० हजार, दुसरे रु. १८ हजार, तिसरे रु. १० हजार, चौथे रु. ८ हजार, पाचवे रु. ५ हजार. उत्तेजनार्थ दीड हजार. ल्कोन जोकरसाठी पहिले रु. १२ हजार, दुसरे रु. ९ हजार, तिसरे रु. ७ हजार, चौथे रु. ५ हजार, पाचवे रु. ३ हजार. उत्तेजनार्थ रु. एक हजार अशी बक्षिसे ठेवली आहेत. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, माननीय पाहुणे म्हणून कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, खास आमंत्रित पाहुणे म्हणून कुडचडे-काकोडा पालिकेच्या नगराध्यक्ष अनिता नाईक, पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस हे उपस्थित राहणार आहेत. या वेळी खास कोकणी संगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यात खास आकर्षण म्हणजे सियेल्डा परेरा व सोनिया सिरसाट यांचा समावेश असणार आहे.