स्थायी समिती जोड

By Admin | Updated: March 21, 2015 00:13 IST2015-03-20T22:39:58+5:302015-03-21T00:13:00+5:30

राष्ट्रवादी-मनसेचे साटेलोटे उघड

Standing Committee attached | स्थायी समिती जोड

स्थायी समिती जोड

राष्ट्रवादी-मनसेचे साटेलोटे उघड
शिवसेनेने रिपाइंच्या ललिता भालेराव यांना उमेदवारी देत स्थायीच्या इतिहासात प्रथमच एका मागासवर्गीय महिलेला संधी दिली आहे आणि त्याच अधिकृत उमेदवार आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपानेही उमेदवार दिला असला तरी सेना-भाजपा व रिपाइं एकत्र येऊन निवडणूक लढवेल. सभापतिपदासाठी मनसेने अर्जच दाखल न केल्याने राष्ट्रवादी व मनसे यांच्यातील साटेलोटे उघड झाले आहे. एकमेकांवर विखारी टीका करणार्‍या आणि मफलर आवळण्याची भाषा करणार्‍या मनसेने स्वत:च्याच गळ्यात मफलर घालून घेतली आहे. सत्तेसाठी वा˜ेल ते करणार्‍या मनसेचा भोंदूपणा उघड झाला आहे.
- अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना
इन्फो
निवडणुकीत पत्ते खोलू
कॉँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीला पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांच्यासमवेत चर्चा सुरू आहे, परंतु कॉँग्रेसने अधिकृतपणे राहुल दिवे यांना उमेदवारी दिली असून, वरिष्ठांकडून जो अंतिम आदेश येईल त्याचे पालन केले जाईल. कॉँग्रेसचेही स्वतंत्र अस्तित्व आहे.
- उत्तमराव कांबळे, गटनेता, कॉँग्रेस
इन्फो
पक्षनिष्ठेमुळे विश्वास
पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने मला स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवारी मिळाली आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल. मनसेच्या पाठिंब्याबाबत वरिष्ठांकडूनच निर्णय होईल.
- शिवाजी चुंभळे, उमेदवार, राष्ट्रवादी

फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९७
स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे. समवेत छबू नागरे, रवींद्र पगार, शोभा आवारे, अर्जुन टिळे, प्रा. कविता कर्डक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर व गटनेता उत्तमराव कांबळे आदि.
फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९८
राहुल दिवे
फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९९
प्रा. कुणाल वाघ
फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर १००
ललिता भालेराव

Web Title: Standing Committee attached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.