व्यावसायिकाची फसवणूक करणा-या कोल्हेला अटक
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:08+5:302016-03-03T01:57:08+5:30
पुणे : विविध महापालिका आणि नगरपरिषदांच्या महिला बालविकास विभागाच्या प्रशिक्षणाचे काम घेतल्याची बतावणी करीत नविन कार्यालय थाटण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला एकाने 3 कोटी 14 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यावसायिकाची फसवणूक करणा-या कोल्हेला अटक
प णे : विविध महापालिका आणि नगरपरिषदांच्या महिला बालविकास विभागाच्या प्रशिक्षणाचे काम घेतल्याची बतावणी करीत नविन कार्यालय थाटण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला एकाने 3 कोटी 14 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गिरीष विजय कोल्हे (वय 37, रा. सहकार्य वसाहत, एरंडवणे, कर्वे रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तुषार पवार (वय 39, रा. अरण्येश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोल्हे आणि पवार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पवार यांचे इंजिनिअरींग वर्कशॉप आहे. कोल्हे याने पिंपरी चिंचवड, नागपुर, ठाणे, नाशिक मनपांसह वर्धा नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रशिक्षणाचे काम घेतल्याचे पवार यांना सांगितले. या कामासाठी निगडीमध्ये कार्यालय सुरु करण्यासाठी तसेच कार्यालयामधील फर्निचर, संगणक आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे खोटे सांगितले. त्यासाठी पवार यांच्याकडून फेब्रुवारी 2010 ते मे 2014 या कालावधीत वेळोवेळी 3 कोटी 14 लाख रुपये उकळले. घेतलेली ही रक्कम परत न करता कोल्हेने त्याचा अपहार केला. पुढील तपास उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते करीत आहेत.