शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

NCRमध्ये PNB हून मोठा घोटाळा, SRS ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 17:37 IST

दिल्ली-एनसीआरमध्ये पंजाब नॅशनल बँकेहून मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. रिअल इस्टेटमधली नावाजलेली कंपनी असलेल्या SRS ग्रुपनं 20 हजार कुटुंबीयांचे 30 हजार कोटी रुपये हडप केल्याला आरोप आहे.

नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये पंजाब नॅशनल बँकेहून मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. रिअल इस्टेटमधली नावाजलेली कंपनी असलेल्या SRS ग्रुपनं 20 हजार कुटुंबीयांचे फ्लॅट देण्याच्या नावाखाली 30 हजार कोटी रुपये हडप केल्याला आरोप आहे. रिअल इस्टेटमधील हा सर्वात मोठा असल्याचं बोललं जातंय. या घोटाळ्यात हरियाणा पोलिसांनी SRS समूहाचे अध्यक्ष अनिल जिंदालसहीत पाच जणांना अटक केली आहे. यात बिशन बन्सल, नानक चंद तायल, विनोद मामा आणि देवेंद्र अधाना यांचा समावेश आहे.SRS समूहावर बँकांकडून हजारो कोटींचं कर्ज घेऊनही परत न केल्याचा आरोप आहे. या पाच जणांच्या अटकेनंतर पोलीस उपायुक्त विक्रम कपूर यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. आरोपींना दिल्लीतल्या महिपालपूरमधल्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करणार आहोत. तसेच आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, याची मागणी करणार असल्याचंही विक्रम कपूर यांनी सांगितलं.या सर्व आरोपींवर चार महिन्यांपूर्वीपासून पोलिसांत कलम 420, 406, 120 बी व हरियाणा प्रोटेक्शन ऑफ इंट्रेस्ट ऑफ डिपोझिटर इन एफई अॅक्ट 2013अंतर्गत 22 गुन्हे दाखल आहेत. अनिल जिंदल यांनी एसआरआस मॉलच्या माध्यमातून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. एसआरएस कारोभार दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थानमधल्या विविध प्रदेशांत पसरलेला आहे. अनिल जिंदल यांनी एसआरएस मॉलनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवलं. परंतु मंदीच्या काळात अनिल जिंदल यांना झटका बसला आहे. या घोटाळेबाजांना भाजपा आणि संघाचा वरदहस्त असल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग