शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

श्रीनगरमध्ये महिलेच्या वेशात दहशतवाद्यानं केला ग्रेनेड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 16:46 IST

श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. पुलवामा जिल्ह्यात महिलेच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्यानं पोलीस कॉन्स्टेबलवर ग्रेनेड हल्ला केला.

जम्मू-काश्मीर- श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. पुलवामा जिल्ह्यात महिलेच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्यानं पोलीस कॉन्स्टेबलवर ग्रेनेड हल्ला केला. परंतु या हल्ल्यात तो स्वतःच शिकार झाला असून, पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. पोलीस कर्मचा-याला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मेहराजुद्दीन जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहत दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. परंतु महिलेच्या वेषातील एक दहशतवादी मुश्ताक अहमद चोपन ग्रेनेड हल्ल्यात जखमी झाला. महिलेचे कपडे घातलेला दहशतवादी मुश्ताक अहमदचा हल्ल्यात खात्मा झाला आहे. काश्मीर घाटीमध्ये सध्या 30 ते 40 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. लीपा घाटी, मंडल, रामपूर आणि इतर ठिकाणी हे दहशतवादी 30 ते 40च्या संख्येत असून, ते समूहानं राहत आहेत.पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जेव्हा गोळीबार करण्यात येतो, त्यावेळीच हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. कुपवाडा आणि तंगधारमध्ये अशाच प्रकारे दहशतवादी घुसले होते. गेल्या काही तासांपूर्वीच सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.या संपूर्ण परिसराला जवानांनी घेराव घातला होता. दरम्यान, परिसरात किती दहशतवाद्यांचा वावर आहे, याबाबती माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही. घटनास्थळावरून सीआरपीएफच्या 45व्या बटालियनचे जवान आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून हे संयुक्त ऑपरेशन चालवण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील (22 फेब्रुवारी) जवानांनी हाजिन परिसरात 2-3 दहशतवाद्यांना घेरलं होतं. एका घरात लपलेले दहशतवादी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करत होते. या दरम्यान एक जवान गंभीर स्वरुपात जखमीदेखील झाला होता. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर