Jyoti Malhotra Priyanka Senapati News:यु ट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणाला झालेल्या अटकेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणा सगळीकडे झाडाझडती सुरू केली आहे. यातच आता आणखी एका यु ट्यूबरचे नाव समोर आले आहे. आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) अर्थात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून या यु ट्यूबरची चौकशी करण्यात आली आहे. प्रियंका सेनापती असे संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या या यु ट्यूबरचे नाव आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरयाणाच्या हिसारमधील प्रसिद्ध यु ट्यूबर ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसोबतचे कनेक्शन उजेडात आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी आता देशभरात पाकिस्तानचे हस्तक बनलेल्यांचा शोध सुरू केला आहे.
आयबी अधिकारी पोहोचले ओडिशामध्ये
ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिचे यु ट्यूबर प्रियंका सेनापतीसोबतही फोटो दिसून आले.तिचाही यात सहभाग आहे का याबद्दल शंका उपस्थित होत आहेत. या प्रकरणात आयबीचे अधिकारी ओडिशातील पुरी पोलिसांच्या सहकार्याने प्रियंका सेनापतीपर्यंत पोहोचले. आयबीकडून तिची चौकशी करण्यात आली.
प्रियंका सेनापती ज्योती मल्होत्राला कशी भेटली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये ज्योती मल्होत्रा पुरीला गेली होती. याच वेळी तिने जगन्नाथ मंदिर आणि आजूबाजूच्या सरकारी कार्यालयांचे फोटो आणि व्हिडीओ तिने शूट केले होते. या ठिकाणांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांना तिने पाठवल्याचा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांना आहे.
वाचा >>व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
पुरीला फिरायला गेली, त्याचवेळी प्रियंका आणि ज्योती मल्होत्रा यांची भेट झाली होती. दोघींची भेट आणि संबंधाबद्दल गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. त्यामुळेच आयबीने आता तिची चौकशी केली आहे. प्रियंका सेनापती काय बोलली?
केंद्रीय गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात आल्यामुळे प्रियंका सेनापती चर्चेत आली आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली आहे.
ती म्हणाली की, 'ज्योती माझी फक्त यु-ट्यूबर मैत्रीण होती. मला तिच्या चुकीच्या कामांबद्दल माहिती नव्हती. जर माहिती असतं की, ती शूत्र देशासाठी हेरगिरी करत आहेत, तर मी तिच्याशी संपर्कच ठेवला नसता. मी एक प्रोफेशनल कॉन्टेंटमुळेच तिला ओळखत होते. तिच्याबद्दल कळल्यानंतर मला धक्का बसला. मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.'