शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आम्ही सगळी मदत केली आहे पण..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर सरकारने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:26 IST

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याबद्दल क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत निवेदन दिले.

Vinesh Phogat Disqualified: कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्याने भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का बसला आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी वजन करताना विनेशचे वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशला अपात्र ठरवल्याने भारताची सुवर्णसंधी हुकली आहे.  विनेशला अपात्र ठरवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अशातच केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनीही या सगळ्या प्रकरणावर सरकारकडून स्पष्टीकरण दिलं आहे.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याबद्दल क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत निवेदन दिले. विनेश फोगटलाअपात्र का ठरवण्यात आले आणि सरकार याबाबत काय करत आहे याची माहिती मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. सकाळी दोनदा विनेशचे वजन तपासण्यात आले. तिचे वजन ५० किलो १०० ग्रॅम असल्याचे आढळून आले. त्यानंतर विनेशला अपात्र ठरवण्यात आले. आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांकडे याबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे, असे मनसुख मांडविया म्हणाले.

"भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडेही निषेध नोंदवला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पीटी उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत. आपल्याला न्याय मिळेल अशी आशा आहे. सरकारने विनेशला सर्वतोपरी मदत केली आहे. तिच्यासाठी वैयक्तिक कर्मचारी नियुक्त केले होते. प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील विनेशसाठी तैनात होते. अनेक स्पॅरिंग पार्टनर्स, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग तज्ञांना पैसे दिले गेले आहेत," असेही मांडवीय यांनी सांगितले.

पीटी उषा यांनी घेतली विनेशची भेट

ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षा पीटी उषा यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. विनेशची अपात्रता अत्यंत धक्कादायक आहे. "थोड्या वेळापूर्वी मी विनेशला ऑलिम्पिक व्हिलेज पॉलीक्लिनिकमध्ये भेटले आणि तिला भारतीय ऑलिम्पिक संघटना, भारत सरकार आणि संपूर्ण देशाच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. आम्ही विनेशला सर्व वैद्यकीय आणि भावनिक आधार देत आहोत. भारतीय कुस्ती महासंघ शक्य तितक्या मजबूत पद्धतीने याचा पाठपुरावा करत आहे. मला विनेशच्या वैद्यकीय पथकाने रात्रभर केलेल्या अथक प्रयत्नांची जाणीव आहे जेणेकरून ती स्पर्धेच्या गरजा पूर्ण करू शकेल," असे पीटी उषा यांनी म्हटलं.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत