क्रीडा : आपीएल लिलाव

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:44+5:302015-02-15T22:36:44+5:30

आज रंगणार आयपीएलचा लिलाव

Sports: Auction Auction | क्रीडा : आपीएल लिलाव

क्रीडा : आपीएल लिलाव

रंगणार आयपीएलचा लिलाव
आठवे सत्र : युवराज, आमलावर सर्वांची नजर
बंगळुरू : इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) आठव्या सत्रासाठी सोमवारी खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे़ भारताचा अनुभवी खेळाडू युवराजसिंह, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्मात असलेला क्रिकेटपटू हाशीम आमला यांच्यावर सर्वांची नजर असेल़
गत आयपीएलमध्ये युवराज सिंहला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ कोटी रुपयात खरेदी केले होते़ या वेळीही त्याला एवढी किंमत मिळते किंवा याकडे सर्वांची नजर असेल़ या व्यतिरिक्त दिल्ली डेअर डेव्हिल्सचा कर्णधार केविन पीटरसन आणि या संघातील सर्वांत महागडा खेळाडू दिनेश कार्तिक यांच्यावरही बोली लागेल़
आफ्रिकेचा हाशीम आमला सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे सर्व संघ मालक त्याला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील असतील, तसेच भारताचा मुरली विजय, श्रीलंकेचा महेला जयवर्धने, कुमार संगकारा, एंजेलो मॅथ्युज, इंग्लंडचा इयान मार्गन, एलेक्स हेल्स आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ॲरोन फिंच यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे़
या लिलाव प्रक्रियेचे संचालन इंग्लंडचे व्यावसायिक निलामीकर्ते रिचर्ड मेडले हे करणार आहेत़ विशेष म्हणजे २००८ पासून ते आयपीएलच्या बोलीची जबाबदारी पार पाडत आहे़
या लिलावापूर्वी १२२ क्रिकेटपटूंना संघांनी २०१५ च्या सत्रासाठी कायम ठेवले आहे़ त्यात ७८ भारतीय आणि ४४ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे़ यावर्षी प्रत्येक फ्रँचायजीला ६३ कोटी रुपये मिळाले आहेत़ ही रक्कम गत सत्रापेक्षा ५ टक्क्याने अधिक आहे़ आयपीएलचे आठवे सत्र ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sports: Auction Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.