शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:08 IST

नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही...

आसाम सरकारने विधानसभेतील जुम्मा ब्रेकसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून आता एनडीएमध्ये फूट पडताना दिसत आहे. जेडीयू नेते नीरज कुमार यांनी शनिवारी आसाम सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.

नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तसेच, जर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी अधिक लक्ष दिले असते तर बरे झाले असते, असेही नीरज यांनी म्हटले आहे. ते एएनआय सोबत बोलत होते. 

कामाख्या मंदिरातील बळी वरही उपस्थित केला सवाल- जेडीयू नेते नीरज कुमार पुढे म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय संविधानाच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे. प्रत्येकाला आपली धार्मिक आस्था जपण्याचा अधिकार आहे. मला मुख्यमंत्री सरमा यांना विचारायचे आहे की, आपण रमझानदरम्यान शुक्रवारच्या सुट्टीवर बंदी घालत आहात आणि त्यामुळे कामाची कार्यक्षमता वाढेल असा दावा करत आहात. माँ कामाख्या मंदिर हा हिंदू परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे, आपण तेथील बळी प्रथेवर बंदी घालू शकता? 

असम सरकारनं जुम्मा ब्रेक रद्द केला - आसाम विधानसभेत कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासांचा ब्रेक आता रद्द करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोट्स करताना सरमा यांनी म्हटले होते, "आसाम विधानसभेने दोन तासांचा जुम्मा ब्रेक रद्द केला आहे. यामुळे काम आणि उत्पादकतेवर परिणाम होत होता. याच बरोबर आम्ही वसाहतवादी काळातील आणखी एक परंपरा संपवली आहे. मुस्लीम लीगचे सैयद सादुल्ला यांनी 1937 मध्ये ही प्रथा सुरू केली होती. मी विधानसभा अध्यक्ष आणि आपल्या आमदारांचे या ऐतिहासिक निर्णयासाठी आभार मानतो." एवढेच नाही तर, या निर्णयाच्या माध्यमाने आम्ही विधानसभेच्या उत्पादकतेला प्राधान्य दिले आहे, असेही मुख्यमंत्री हिमंता यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :AssamआसामNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा