सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:38 IST2020-03-28T02:44:54+5:302020-03-28T05:38:33+5:30
भारतातून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत सगळ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. या संकटप्रसंगी गोएअर आणि इंडिगो कंपन्यांनीदेखील सरकारला कोरोना विषाणूचा प्रसार रोखणाºया कोणत्याही मोहिमेसाठी विमाने कर्मचाऱ्यांसह देण्याची तयारी दाखवली आहे.

सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दिवसांत कोणत्याही मानवतावादी मोहिमेत सरकारला स्पाईसजेट विमान कंपनीने सेवा देण्याची तयारी दाखवली आहे.
आमची विमाने संबंधित कर्मचाऱ्यांसह आम्ही उपलब्ध करून देऊ आणि स्थलांतरित मजुरांना (विशेषत: बिहारमधील) पाटण्यात नेण्यासाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणेही देण्याची आमची तयारी आहे, असे कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी शुक्रवारी सांगितले.
भारतातून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत सगळ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. या संकटप्रसंगी गोएअर आणि इंडिगो कंपन्यांनीदेखील सरकारला कोरोना विषाणूचा प्रसार रोखणाºया कोणत्याही मोहिमेसाठी विमाने कर्मचाऱ्यांसह देण्याची तयारी दाखवली आहे.
स्थलांतरित मजुरांना गुजरातेत प्रवासबंदी
गांधीनगर : स्थलांतरित मजुरांसाठी लॉकडाऊनच्या दिवसांत अन्न आणि निवासाची व्यवस्था केली जाईल; परंतु त्यांना त्यांच्या खेड्यात जाण्यासाठी प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही, असे गुजरात सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले.
हा निर्णय मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लॉकडाऊनमुळे किती तरी रोजंदारी कामगार बेरोजगार झाले असून ते पैसे व वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे आपापल्या गावाकडे पायीच निघाले आहेत.