शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पाटण्याला जाणारं विमान 'त्यानं' बनारसमध्ये उतरवलं अन् म्हणाला, माझी ड्युटी संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 7:10 PM

वैमानिकाच्या असहकारामुळे प्रवाशांना मनस्ताप

बनारस: स्पाईसजेटच्या विमानानं दिल्लीहून पाटण्याला जाणारे प्रवासी काही वेळ बनारसला अडकून पडल्याची घटना घडली. स्पाईसजेटच्या SG 8480 विमानानं दिल्लीहून पाटण्याला जाण्यासाठी उड्डाण केलं. मात्र खराब हवामानामुळे वैमानिकानं बनारसमध्ये विमान उतरवलं. यानंतर हवामान विमान उड्डाणास अनुकूल झालं. मात्र वैमानिकानं उड्डाण करण्यास नकार दिला. यासाठी वैमानिकानं ड्युटी संपल्याचं कारण दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. माझी ड्युटी संपली असल्यानं मी विमान उड्डाण करणार नाही, असं कारण वैमानिकानं दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला. वैमानिकाच्या या पवित्र्यामुळे प्रवासी अडचणीत सापडले. या विमानानं गुरुवारी रात्री 8 वाजता दिल्लीहून पाटण्यासाठी उड्डाण केलं होतं. मात्र बनारसमधून विमान उड्डाण करण्यास नकार दिल्यानं गैरसोयी झाल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली. विमान कंपनीकडून कोणतीही मदत न मिळाल्याचा आरोपदेखील प्रवाशांनी केला. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. गेल्या महिन्यात स्पाईसजेटच्या विमानातून धूर निघाल्याची घटना घडली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोईबंतूरहून बंगळुरुला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला होता.  

टॅग्स :spicejetस्पाइस जेटAirportविमानतळ