शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

राजकीय पक्षांचा फेसबुक, गुगलवर प्रचारासाठी ५३ कोटी रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:34 IST

भाजप सर्वांत पुढे : काँग्रेस, तृणमूल, आम आदमी पार्टीचाही समावेश

नवी दिल्ली : भारतातील राजकीय पक्षांनी फेब्रुवारीपासून आतापर्यंत फेसबुक व गुगल आदी डिजिटल माध्यमांत प्रचारासाठी ५३ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. यात देशातील सत्तारूढ भारतीय जनता पार्टीचा खर्च सर्वाधिक आहे.

भारतात १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली होती. त्यातील सातव्या व अखेरच्या टप्प्याचे मतदान रविवारी पार पडले व २३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

फेसबुकच्या जाहिरातीशी संबंधित अहवालानुसार, यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून १५ मेपर्यंत १.२१ लाख राजकीय जाहिराती मिळाल्या. या जाहिरातींवर राजकीय पक्षांनी २६.५ कोटी रुपये खर्च केले.सत्तारूढ भाजपने फेसबुकवरील २,५०० पेक्षा अधिक जाहिरातींवर ४.२३ कोटी रुपये खर्च केले. माय फर्स्ट व्होट फॉर मोदी, भारत के मन की बात, नेशन विथ नमो यासारख्या पेजनेही सोशल नेटवर्र्किं ग वेबसाईटवरील जाहिरातींवर चार कोटी रुपये खर्च केले. गुगलच्या व्यासपीठावर भाजपने १७ कोटी रुपये खर्च केले.

काँग्रेसने फेसबुकवरील ३,६८६ जाहिरातींवर १.४६ कोटी रुपये खर्च केले. तसेच गुगलवरील ४२५ जाहिरातींवर २.७१ कोटी रुपये खर्च केले.फेसबुकने दिलेल्या आकडेवारीनुसार तृणमूल काँग्रेसने त्यांच्याकडील जाहिरातींसाठी २९.२८ लाख रुपये खर्च केले. आम आदमी पार्टीने फेसबुकवर १७६ जाहिराती चालवल्या व त्यासाठी १३.६२ लाख रुपये मोजले. त्याचप्रमाणे गुगलने दिलेल्या माहितीनुसार, आॅर्बन डिजिटल सॉल्युशन्स आपसाठी जाहिराती करत असून, त्याने १९ मेनंतर २.१८ कोटी रुपयांचे बिल दिले.यूट्यूबवरही झळकल्या जाहिरातीयाचप्रमाणे गुगल, यूट्यूब व त्याच्या सहायक कंपन्यांना १९ फेब्रुवारीपासून आतापर्यंतच्या १४,८३७ जाहिरातींवर राजकीय पक्षांनी २७.३६ कोटी रुपये खर्च केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस