इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 07:21 IST2026-01-31T07:20:58+5:302026-01-31T07:21:32+5:30

Engineering Student: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय देशातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभवाची संधी उपलब्ध करून देणार आहे. उच्च शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम तयार केला आहे.

Special internship program for engineering students | इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम

- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय देशातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभवाची संधी उपलब्ध करून देणार आहे. उच्च शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम तयार केला आहे. सध्या देशात १५० महामार्गांची कामे सुरू असून या ठिकाणी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी करार करून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्याची योजना आखली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महामार्ग डिझाइन, बांधकाम प्रक्रिया, प्रकल्प नियोजन आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करीत काम करण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात ६०० विद्यार्थ्यांची निवड करणार
ही इंटर्नशिप एक ते सहा महिन्यांपर्यंत उपलब्ध राहणार आहे. इंटर्नशिपच्या काळात विद्यार्थ्यांना २० हजार रूपये स्टायपेंड दिला जाईल. आयआयटी, एनआयटी आणि एआयसीटीई-मान्यताप्राप्त अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६०० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे.

Web Title : नितिन गडकरी मंत्रालय द्वारा इंजीनियरिंग छात्रों के लिए इंटर्नशिप कार्यक्रम

Web Summary : इंजीनियरिंग छात्रों को राजमार्ग परियोजनाओं में मिलेगा व्यावहारिक अनुभव। कार्यक्रम छह महीने तक की इंटर्नशिप और ₹20,000 का वजीफा प्रदान करता है। शुरुआत में, आईआईटी, एनआईटी और एआईसीटीई-मान्यता प्राप्त संस्थानों से 600 छात्रों का चयन किया जाएगा।

Web Title : Internship Program for Engineering Students by Nitin Gadkari's Ministry

Web Summary : Engineering students will get practical experience in highway projects. The program offers internships up to six months with a ₹20,000 stipend. Initially, 600 students from IITs, NITs, and AICTE-approved institutions will be selected.