शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

चारा घोटाळा; सीबीआयचं विशेष कोर्ट आज देणार निकाल, प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 8:25 AM

बिहारमधील बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे.

रांची- बिहारमधील बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. या घोटाळ्यात आरोपी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांसारख्या दिग्गजांच्या नशिबाचा आजा फैसला होणार आहे. चारा घोटाळ्यात इतर 22 जणांवरही आरोप आहे. रांचीमधील सीबीआयचं विशेष कोर्ट या प्रकरणी आज निकाल देईल. 

 

2जी घोटाळ्याप्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनाही चारा घोटाळ्यातून सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. या घोटाळ्यात भाजपानेच आपल्याला फसवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पण, न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण भरवसा असून या प्रकरणात आपल्याला नक्की न्याय मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केस चालविण्याचा राज्यपालांनी दिलेला आदेश रद्द केला. 

चारा घोटाळा प्रकरण नेमकं काय ?

चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे. 

लालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्री पद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलंहोतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलिही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती. 

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.

लालू रांचीत दाखललालूप्रसाद यादव हे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह रांचीत पोहोचले आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास भोगावा लागतोय की जामीन मिळतोय, हे आज ठरणार आहे.आज कोणत्या प्रकरणात निर्णय येणार?देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Fodder scamचारा घोटाळाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव