Southern star actress and BJP leader Khushboo Sundar's car crashed, expressed suspicion of assault | दक्षिणेतील स्टार अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारला अपघात, घातपाताचा संशय

दक्षिणेतील स्टार अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारला अपघात, घातपाताचा संशय

ठळक मुद्देसुदैवाने या अपघातात खुशबू सुंदर ह्या बालंबाल बचावल्याहा अपघात हा घातपात असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहेआमची कार योग्य लेनमधून जात होती. मात्र अचानक एका टँकरने आमच्या कारला धडक दिली

चेन्नई - दक्षिणेतील स्टार अभिनेत्रींपैकी एक आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या खुशबू सुंदर यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात खुशबू सुंदर यांच्या कारच्या एका बाजूचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. सुदैवाने या अपघातात खुशबू सुंदर ह्या बालंबाल बचावल्या. दरम्यान, हा अपघात हा घातपात असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

खुशबू सुंदर यांनी याबाबत ट्विट करून सांगितले की, आमची कार योग्य लेनमधून जात होती. मात्र अचानक एका टँकरने आमच्या कारला धडक दिली. आमची कार टँकरवर आदळलेली नाही. हा अपघात मेलमरवाथूरजवळ झाला. खुशबू सुंदर एका कार्यक्रमासाठी कडलोर येथे जात असताना हा अपघात घडला.दरम्यान, आपल्या पाठीराख्यांचे आणि समर्थकांचे खुशबू सुंदर यांनी आभार मानले आहेत. मी भगवान मुरुगन यांच्या कृपेने वाचले. या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र माझी कडलोरचा दौरा सुरू राहील.

त्या पुढे म्हणाल्या की, कंटेनरने आमच्या कारला धडक दिली ही बाबत प्रसारमाध्यमांनी विचार करायला हवा. आमची कार योग्य लेनमधून पुढे जात होती. तेवढ्यात अचानक कंटेनर आला आणि त्याने आमच्या कारला टक्कर दिली. दरम्यान, या प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत. तसेच ड्रायव्हरचीही चौकशी सुरू आहे.  

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Southern star actress and BJP leader Khushboo Sundar's car crashed, expressed suspicion of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.