शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 11:01 IST

अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. 

लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या एका महिला इंजिनिअरला सोनूने नोकरीची संधी दिली आहे. कोरोनामुळे या महिलेला आपली नोकरी गमवावी लागली. परस्थिती बिकट असल्याने तिने हैदराबादमध्ये भाजी विकायला सुरुवात केली. शारदा असं या 28 वर्षीय महिलेचं नाव असून सोनू सूदने तिला नोकरीची ऑफर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शारदाने लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यावर घर चालवण्यासाठी भाजी विकायला सुरुवात केली. एका युजरने सोनू सूदला ट्विटरवरून या गोष्टीची माहिती दिली. तसेच या पोस्टमध्ये त्याला टॅग करत महिला इंजिनिअरची मदत करण्याची विनंती केली होती. 

सोनू सूदच्या टीमने शारदाची भेट घेतली आणि तिला नोकरीचं ऑफर लेटर दिलं आहे. स्वत: सोनू सूद याने आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. शारदाने सोनू सूदचे मदतीसाठी आभार मानले आहेत. तसेच त्याच्याप्रमाणे इतरही लोकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही सोनू सूद कित्येक गरजूंना सर्वोतोपरी मदत केली आहे. त्याचे हे कौतुकास्पद काम सातत्याने सुरू आहे. कोरोनाच्या संकटात तो लोकांसाठी देवदूत ठरला आहे.

सोनू प्रवाशी मजुरांना त्यांच्या गावात रोजगारही मिळवून देणार आहे. त्यासाठी तो एक अ‍ॅप घेऊन आला. याचं नाव 'प्रवासी रोजगार' आहे. याने मजुरांना रोजगार शोधण्यास मदत मिळेल. सोनू सूद हा कोरोना महामारीत लोकांसाठी मसीहा बनूनच समोर आला आहे. लोकांना घरी पोहोचवण्यासोबतच त्यांच्या डोक्यावर छत दिल्यानंतर आता तो गरजू लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करत आहे. 'आपल्या गावी परतल्यावर लोक आता रोजगार शोधत आहेत. सध्या काम मिळणं फार कठीण आहे. भलेही केंद्र सरकारची योजना आहे. पण लोकांना सध्या लॉंग टर्म सॉल्यूशनची गरज आहे. या मजुरांना शहरांमध्ये, गावांमध्ये कामाशी जोडणं गरजेचं आहे. तसेच त्यांच्या गावातही त्यांच्यासाठी काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन' असं सोनूने म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण

सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतjobनोकरीbollywoodबॉलिवूड