1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:59 PM2021-05-12T13:59:58+5:302021-05-12T14:01:22+5:30

सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे.

Sonu Sood arrives in 10 minutes for harbhajan singh with remdisivir enjection | 1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद

1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद

Next
ठळक मुद्देकर्नाटकमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णास या इंजेक्शनची गरज होती. त्याबाबतचे संपूर्ण तपशील भज्जीनं आपल्या ट्विटमध्ये दिला होता.

मुंबई - देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत असताना पुन्हा एकाद बालिवूड अभिनेता आणि लॉकडाऊनचा मसिहा सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच तो दिग्गजांच्याही मदतीला धावून जात आहे. नुकतेच टीम इंडियाचा माजी गोलदाज हरभजनसिंगलाही सोनूने मदत केलीय. 

सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा जाणवतो आहे. यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लॉन्ट घेण्याचे ठरविले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूदने फ्रान्स आणि इतर देशांमधून ऑक्सिजन प्लॉन्ट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यासाठी आणतो आहेत. त्यासोबतच तो अनेकांच्या अडचणींना दररोज तोंड देत आहे. 

हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंवरुन, 1 रेमडेसीवीर इंजेक्शनची अर्जंट गरज असल्याचं म्हटलं होतं. भज्जीच्या या ट्विटला 10 ते 12 मिनिटांतच सोनूने रिप्लाय दिला. त्यामध्ये, भज्जी थोड्यात वेळात इंजेक्शन तिथे पोहोचलेलं असेल, असे ट्विट सोनू सूदने केलंय. 


कर्नाटकमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णास या इंजेक्शनची गरज होती. त्याबाबतचे संपूर्ण तपशील भज्जीनं आपल्या ट्विटमध्ये दिला होता. त्यानंतर, सोनू सूदने या ट्विटची दखल घेत, तात्काळ इंजेक्शन पुरविण्याची सोय केली आहे. 

सोनू सूदने फ्रान्सहून मागवला ऑक्सिजन प्लान्ट

रिपोर्टनुसार, सोनू सूदकडून पहिल्या ऑक्सिजन प्लॉन्टची ऑर्डर देण्यात आली आहे आणि ते 10-12 दिवसांत फ्रान्समधून भारतात येईल. सोनू सूद पुढे म्हणाला, 'वेळ आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर येईल आणि आम्ही अधिक जीव गमावू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत'. सोशल मीडियावर पुन्हा एकदा सोनू सूदच्या कार्याचे कौतुक होते आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonu Sood arrives in 10 minutes for harbhajan singh with remdisivir enjection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app