सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 20:15 IST2017-10-27T20:11:01+5:302017-10-27T20:15:16+5:30

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Sonia Gandhi's condition worsened, admitted to hospital | सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सोनिया गांधी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या, तेथून आल्यानंतर अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.



 

सोनिया गांधी यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली उपतार सुरु करण्यात आले आहेत. सोनिया गांधी यांच्या प्रकृती संदर्भात अद्याप डॉक्टरांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

गेल्यावर्षीही वाराणसीमध्ये एका रोड-शो दरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ३ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचं एक ऑपरेशन करण्यात आलं होतं.

Web Title: Sonia Gandhi's condition worsened, admitted to hospital