शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Sonia Gandhi: "फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे लोकशाहीला धोका"- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 12:59 IST

Sonia Gandhi: ''राजकीय पक्ष फेसबुक आणि ट्विटरसारख्या जागतिक कंपन्यांचा वापर पॉलेटीकल नरेटीव्ह सेट करण्यासाठी करत आहेत."

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकशाही हॅक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी लोकसभेत बोलताना सोनिया गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मांडणीचा मुद्दा उपस्थित केला. ''सोशल मीडियाचा वापर करुन आपली लोकशाही हॅक करण्याचा प्रयत्न होतोय,'' असं सोनिया गांधी म्हणाल्या. 

काँग्रेस अध्यक्षा पुढे म्हणतात, ''राजकीय पक्ष फेसबुक आणि ट्विटरसारख्या जागतिक कंपन्यांचा वापर पॉलेटीकल नरेटीव्ह सेट करण्यासाठी करत आहेत. या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत ​​नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. सत्तेच्या संगनमताने फेसबुकद्वारे ज्या प्रकारे सामाजिक सौहार्द बिघडवले जात आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे'', असं सोनिया गांधी म्हणाल्या. 

त्या पुढे म्हणाल्या की, ''जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीत फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा हस्तक्षेप दिसून आला आहे. मी हा प्रभाव आणि हस्तक्षेप संपवण्याची सरकारला विनंती करते. माझे मत पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे आहे. सत्तेत कोणीही असो, आपण आपली लोकशाही आणि सामाजिक सौहार्द जपले पाहिजे. या सोशल साईटवरुन तरुण आणि वृद्धांची मने द्वेषाने भरली जात आहेत,'' असंही त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या पाच प्रदेशाध्यक्षांवर कारवाईनुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला आपली सत्ता राखता आली नाही, तर इतर राज्यातही भाजपने काँग्रेसची दयनीय अवस्था केली. या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासोबतच पाचही राज्यांच्या अध्यक्षांकडून राजीनामा मागितला आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसFacebookफेसबुकTwitterट्विटर