शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग कामातून बोलायचे; सोनियांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 19:23 IST

काही जण काम करतात, तर काही जण श्रेय लाटतात; सोनियांची मोदींवर टीका

नवी दिल्ली: काही जण काम करतात. मात्र काही जण काम न करता फक्त श्रेय लाटतात, अशा शब्दांमध्ये यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं कौतुक करत मोदींना लक्ष्य केलं. इंदिरा गांधी शांती पुरस्कार वितरण सोहळ्यात भाषण करताना सोनिया गांधींनी वारंवार मनमोहन सिंग यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी केली. मनमोहन सिंग यांनी कधीही कोणाच्याही कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते स्वत:बद्दल फार बोलायचे नाहीत, असं म्हणत सोनियांनी मोदींवर टीका केली. 'मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधींसोबत दीड दशकांपेक्षा अधिक काळ काम केलं. मात्र ते कधीही मोठमोठ्या बाता मारायचे नाहीत. त्यांनी कधीही स्वत:चं कौतुक केलं नाही. त्यांनी कधीच कोणतंही पद मागितलं नाही. देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी संपूर्ण जगात सन्मान कमावला. येणाऱ्या काळात आम्ही सतत त्यांचं मार्गदर्शन घेत राहू,' असं म्हणत सोनियांनी मनमोहन यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. रविवारी पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमध्ये एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसमध्ये फक्त गांधी कुटुंबाला महत्त्व असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसनं गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला पाच वर्षांसाठी अध्यक्षपद द्यावं, असं आव्हान त्यांनी दिलं. 'सीताराम केसरी या दलित, पीडित आणि शोषित समाजातील व्यक्तीला काँग्रेसनं अध्यक्षपदावरुन कसं दूर केलं, हे संपूर्ण देशाला माहित आहे. त्यांना थेट फुटपाथवर फेकण्यात आलं होतं. त्यानंतर ती जागा सोनिया गांधींना देण्यात आली,' असं मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा