सोनिया गांधींच्या प्रकृतीत बिघाड, शिमल्याहून मध्यरात्री दिल्लीत परतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 12:00 IST2018-03-23T12:00:07+5:302018-03-23T12:00:07+5:30

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींना काल मध्यरात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिमल्याहून नवी दिल्लीत हलवण्यात आलं आहे. शिमल्यात त्या त्यांच्या निर्माणाधीन बंगल्याचं बांधकाम पाहण्यासाठी आल्या होत्या.

Sonia Gandhi rushed to Chandigarh from Shimla following health complications | सोनिया गांधींच्या प्रकृतीत बिघाड, शिमल्याहून मध्यरात्री दिल्लीत परतल्या

सोनिया गांधींच्या प्रकृतीत बिघाड, शिमल्याहून मध्यरात्री दिल्लीत परतल्या

शिमला- यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींना काल मध्यरात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिमल्याहून नवी दिल्लीत हलवण्यात आलं आहे. शिमल्यात त्या त्यांच्या निर्माणाधीन बंगल्याचं बांधकाम पाहण्यासाठी आल्या होत्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी इथे मुलगी प्रियंका गांधी वाड्रासोबत आल्या होत्या.

शिमल्यातल्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज(आयजीएमसी) रुग्णालयातल्या वरिष्ठ चिकित्सा अधीक्षक डॉक्टर रमेश चंद यांनी त्यांना दिल्लीतल्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली आहे. ते म्हणाले सोनिया गांधींसोबत एक डॉक्टर आणि अँब्युलन्सनं त्यांना मध्यरात्रीच दिल्लीत पाठवण्यात आलं आहे. सोनिया गांधी रात्री शिमल्याहून निघाल्यात आणि रस्त्यात त्यांना एक डॉक्टरांची टीम मिळाली. त्यानंतर काही वेळ त्या पंचकुलामध्ये थांबल्या होत्या. डॉक्टर चंदीगडपर्यंत त्यांच्यासोबत होते. त्यानंतर स्पेशल विमानानं त्या दिल्लीला रवाना झाल्या. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही सोनिया गांधींची प्रकृती बिघडली होती. 

Web Title: Sonia Gandhi rushed to Chandigarh from Shimla following health complications