सोनिया गांधी शेतकऱ्यांना भेटल्या
By Admin | Updated: March 20, 2015 23:50 IST2015-03-20T23:50:56+5:302015-03-20T23:50:56+5:30
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी राजस्थानच्या कोटाजवळील दरबीजी गावाला भेट देऊन पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस केली.

सोनिया गांधी शेतकऱ्यांना भेटल्या
कोटा : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी राजस्थानच्या कोटाजवळील दरबीजी गावाला भेट देऊन पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस केली. या भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले असून गुरेढोरेही मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.
कोटा विमानतळावर उतरल्यानंतर त्या कोटापासून ३५ कि. मी. अंतरावरील सुलतानपूर पंचायत भागातील दरबीजी या गावी गेल्या. शेतकऱ्यांना भेटून त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. अनेक शेतकऱ्यांनी आपबीती सांगितल्यानंतर सोनियांनी त्यांना धीर दिला. काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट व अन्य नेते त्यांच्यासोबत होते. (वृत्तसंस्था)