शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 10:04 IST

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे.

ठळक मुद्देभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. इंदिरा गांधींच्या 35 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'आजीने मला खूप काही शिकवलं. पोलादासारखे मजबूत उद्दिष्ट आणि निडरपणे घेतलेले निर्णय हे प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन करतात' अशा  शब्दात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. एक कणखर नेत्या, 'आयर्न लेडी' म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते. त्यामुळे अनेक कठोर प्रसंगांना इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले होते. मात्र, इंदिराजींच्या याच धाडसी बाण्याचे कौतुक अनेक वर्षं होत आहे.

इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. ज्यांच्या अढळ निर्णयांनी जगाला भारतापुढे झुकायला भाग पाडलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. भारतानं त्यांच्या कार्यकाळात अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार थोपवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारत आण्विक संपन्न देश झाला. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला विरोधकांनी नेहमीच विरोध केला. परंतु त्या कोणालाही न जुमानता देशाहिताचे निर्णय घेत राहिल्या. त्यामुळेच त्यांना आयर्न लेडी म्हटलं जातं.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी