"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 00:29 IST2025-07-25T00:28:53+5:302025-07-25T00:29:22+5:30
Revanth Reddy News: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहे. सोनिया गांधी यांचा उल्लेख देवी असा करत रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्यामुळेच तेलंगाणा राज्याचं स्वप्न पूर्ण झालं, असा दावा केला आहे.

"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहे. सोनिया गांधी यांचा उल्लेख देवी असा करत रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्यामुळेच तेलंगाणा राज्याचं स्वप्न पूर्ण झालं, असा दावा केला आहे. मात्र आता यावरून राजकारणाला तोंड फुटलं असून, भाजपाने रेवंत रेड्डी यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.
भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांना देवाच्याही वरचं स्थान दिलं आहे. त्यांनी वापरलेली विशेषणं आपण श्रीराम, श्रीकृष्ण किंवा इतर देवदेवतांसाठी वापरतो. काँग्रेसमध्ये भक्तीला कुठलीही मर्यादा नाही आहे. तिथे चाटुकारिता हिची मुख्य विचारसरणी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, रेवंत रेड्डी हे एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की, सोनिया गांधी यांच्यामुळेच आम्हाल तेलंगाा राज्य मिळालं आहे. याच तेलंगाणामधून राहुल गांधी यांना जातनिहाय जनगणनेचं आश्वासन दिलं होतं. तसेच ते पूर्ण करण्यासाठी मी पुढाकार घेतला. मी सर्व वर्गातील लोकांना बोलावून जातनिहाय जनगणना करण्याची आवश्यकात त्यांना समजावून सांगितली. तसेच ४ फेब्रुवारी २०२४ पासून सर्वेक्षण सुरू करून ४ फेब्रुवारी २०२५ रोजी अवघ्या एका वर्षात आम्ही हे काम पूर्ण केले. तसेच त्याची माहिती विधानसभेच्या पटलावर ठेवली. तसेत आता आम्ही ४ फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.