शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

NDA सरकारमुळे देशासमोर संकटे उभी -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:43 AM

देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : देश आज भयावह आर्थिक संकट, भयंकर महामारी आणि आता चीनशी सीमेवर मोठ्या संकटाला तोंड देत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही संकटे उभी ठाकली आहेत. देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.व्हिडिओद्वारा पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला त्या मार्गदर्शन करीत होत्या. सोनिया गांधी म्हणाल्या, देशासमोरील आर्थिक परिस्थिती आधीच्या अपेक्षेत आणखी गंभीर बनली आहे. मोदी सरकार प्रत्येक सूचनेकडे दुर्लक्ष करते आहे. सरकारी तिजोरीतून गरिबांच्या थेट हातात पैसे दिले जावेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण करून त्यांचे पोषण करणे याला सरकारचे प्राधान्य हवे; परंतु सरकारने पोकळ पॅकेज जाहीर केले. त्यात सकल देशी उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षाही कमी राजकोषीय प्रोत्साहन होते, असेही त्या म्हणाल्या.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले की,आपल्या सैनिकांनी ज्यासाठी बलिदान केले, ती परिस्थिती पंतप्रधानांनी स्वीकारली. चीनकडून जी आगळीक झाली ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे गांधी म्हणाले.>आर्थिक परिस्थिती सावरण्यास लागणार मोठा काळआज भारताची ढासळती अर्थव्यवस्था ४२ वर्षांत प्रथमच तेजीकडून मंदीकडे घसरत चालली आहे. मला भीती वाटते की, यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल, नागरिकांचे उत्पन्न घटेल, मजुरी कमी होऊन गुंतवणूक खाली येईल.याचा परिणाम देशाला त्यातून बाहेर पडायला फार मोठा काळ लागेल. हेसुद्धा सरकार व्यवस्था ठीक करील आणि ठोस आर्थिक धोरण राबवेल तेव्हाच शक्य आहे, असा इशारा गांधी यांनी दिला.सरकारला पूर्ण पाठिंबा दिल्यानंतरही ते लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करण्यास तयार नाही. कोट्यवधी स्थलांतरित मजदूर, रोेजंदारीवरील लोकांसह अनेकांचा रोजगार गेला, असे त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले की, ‘सरकारने पूर्ण धाडसाने महामारीला तोंड दिले नाही. चीनला सीमेवर तोंड देण्यात सरकारचा कमकुवतपणा दिसला. आम्ही पूर्ण शक्तीनिशी ते संकट निपटून काढणे गरजेचे होते. आमचा हा दुबळेपणा गंभीर संकटाचे कारण ठरेल.’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधी