Sonia Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, 'ईडी'च्या चौकशीला जाणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 13:18 IST2022-06-02T12:40:32+5:302022-06-02T13:18:13+5:30

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाच लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिल ...

sonia gandhi corona positive says congress leader randeep surjewala | Sonia Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, 'ईडी'च्या चौकशीला जाणार का?

Sonia Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, 'ईडी'च्या चौकशीला जाणार का?

नवी दिल्ली-

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाच लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिल आहे. यासोबत सोनिया गांधी गेल्या काही दिवसांत ज्या नेत्यांना भेटल्या होत्या त्यातील काही नेते देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याचंही सुरजेवाला यांनी सांगितलं. सुरजेवाला यांना दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना काल संध्याकाळी सौम्य स्वरुपाचा ताप आला. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

सोनियांनी स्वत:ला सध्या आयसोलेट करुन घेतलं असून आपल्या संपर्कात आलेल्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केल्याचं सुरजेवालांनी सांगितलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्या असून ८ जूनपर्यंत त्या बऱ्या होतील असा विश्वास सुरजेवाला यांनी व्यक्त केला आहे. 

८ जून रोजी ईडीची चौकशी
सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं चौकशीसाठीची नोटीस धाडली आहे. येत्या ८ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. पण आता सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं चौकशीसाठी त्या उपस्थित राहणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

Read in English

Web Title: sonia gandhi corona positive says congress leader randeep surjewala