शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

महाराष्ट्रातील 'या' खासदारासाठी सोनिया गांधींनी ड्रायव्हरकडून 120 रूपये घेतले उसने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 9:47 AM

रजनी पाटील या मंगळवारी राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये बसल्या होत्या.

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मावळत्या खासदार रजनी पाटील यांच्यासाठी मंगळवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. राज्यसभा खासदार असलेल्या रजनी पाटील यांना काँग्रेसकडून यावेळी पुन्हा संधी देण्यात आली नाही. मात्र, मंगळवारी रजनी पाटील यांना आलेल्या सुखद अनुभवामुळे त्यांच्या मनात कोणतीही खंत राहणार नाही, हे मात्र निश्चित.रजनी पाटील या मंगळवारी राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी कोणीतरी सोनिया गांधी तुम्हाला शोधत असल्याचा निरोप दिला. निरोप मिळाल्यावर रजनी पाटील घाईघाईने सेंट्रल हॉलच्या बाहेर पडल्या. पाटील यांनी बाहेर येऊन सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी सोनिया गांधी घरी जायला निघाल्या होत्या. राज्यसभेत नसल्यामुळे आता कदाचित रजनी पाटील यांची नेहमी भेट होणार नाही, या विचाराने सोनियांनी त्यांना आपल्या गाडीतून घरापर्यंत येण्याची विनंती केली. गाडीत बसल्यानंतर सोनिया गांधी आणि रजनी पाटील यांच्या संभाषणाला सुरुवात झाली. तुम्ही राज्यसभेत नसलात तरी पक्ष कायम तुमच्यासोबत असेल, असे सोनियांनी पाटील यांना सांगितले. त्यानंतर संपूर्ण रस्त्यात या दोघींच्या गप्पा अशाच सुरू होत्या. परंतु, गाडी सोनियांच्या 10 जनपथ या निवासस्थानी आल्यानंतर रजनी पाटील यांना गाडीतून उतरताना अचानक काहीतरी आठवले आणि त्यांना थोडासा धक्का बसला. सोनियांच्या निवासस्थानापासून रजनी पाटील यांना खासगी वाहनाने संसदेपर्यंत जावे लागणार होते. मात्र, सेंट्रल हॉलमधून घाईघाईत निघताना रजनी पाटील त्यांची पर्स आणि मोबाईल तेथेच विसरुन आल्या होत्या. त्यांची गाडीही संसदेच्या आवारात पार्क केली होती. त्यामुळे आता पैशांशिवाय संसदेपर्यंत कसे परत जायचे, असा प्रश्न रजनी पाटलांना पडला. त्यांनी ही गोष्ट सोनिया गांधींना सांगितली. मात्र, त्यावेळी सोनिया गांधी यांच्याजवळही पैसे नव्हते. तेव्हा सोनियांनी आपल्या ड्रायव्हरकडून 120 रुपये उसने घेऊन रजनी पाटील यांना दिले. हे पैसे घेऊन रजनी पाटील 24 अकबर रोडवर असलेल्या काँग्रेस मुख्यालयापर्यंच चालत गेल्या. तेथून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रजनी पाटील यांना संसदेत जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा यांना पाटील यांची पर्स आणि मोबाईल मिळाला. त्यांनी तो आपल्याकडे ठेवून घेतला.मात्र, रजनी पाटील यांची स्वारी संसदेत आल्यानंतर भलतीच खुश होती. त्या बराचवेळ संसदेत बसून होत्या आणि येणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला हा किस्सा सांगत होत्या. आपण सोनियाजींनी दिलेले 120 रुपये खर्च न करता आपल्याकडेच आठवण ठेवणार असल्याचे रजनी पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा