शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 00:17 IST

लेहमधल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना अटक करुन जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले.

Sonam Wangchuk: लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आणि कडक सुरक्षेत त्यांना लडाखहून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. सोनम वांगचुक यांना २४ तास सीसीटीव्ही देखरेखीखाली उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर वांगचुक यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वांगचुक यांनी हिंसाचार भडकवल्याचा आरोप गृहमंत्रालयाने केला आहे.

लेह हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर, शुक्रवारी पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांना अटक केली. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आणि जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. परिस्थितीमुळे लेहमधील इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला तर ७० हून अधिकजण जखमी झाले. दुसरीकडे हिंसाचार करणाऱ्या ५० जणांना अटक करण्यात आली आहे.

लेह विमानतळावर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, सोनम वांगचुक यांना एका विशेष विमानाने राजस्थानातील जोधपूर येथे नेण्यात आले. जोधपूर येथे येताच त्यांना कडक सुरक्षेत आणि अनेक सुरक्षा वाहनांच्या ताफ्यात उच्च-सुरक्षा तुरुंग वॉर्डमध्ये हलवण्यात आले, जिथे त्यांना २४ तास सुरक्षा आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवण्यात येईल. लेह पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्याविरुद्ध निदर्शकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याबद्दल अनेक एफआयआर नोंदवला होता.

१० सप्टेंबर रोजी, सोनम वांगचुक यांनी लेह शहरात उपोषण सुरू केले, ज्यासाठी त्यांनी या प्रदेशाचा सहाव्या अनुसूचीत समावेश, राज्याचा दर्जा आणि लडाख प्रदेशाच्या संवेदनशील परिसंस्थेचे संरक्षण या मागण्या केल्या. शहरात व्यापक हिंसाचार उफाळल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्यांनी उपोषण सोडले.  बुधवारी लेह शहरात जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक केली. सीआरपीएफच्या एका वाहनाला आग लावण्यात आली. तसेच भाजप कार्यालय आणि लेहच्या सर्वोच्च राजकीय संघटनेचे कार्यालयही जाळण्यात आले आणि लडाखच्या डीजीपींच्या वाहनाचेही नुकसान केले. परिस्थिती चिघळत असताना, सुरक्षा दलांनी गोळीबार केला, ज्यामध्ये चार निदर्शक ठार झाले आणि अंदाजे ७० जण जखमी झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonam Wangchuk Jailed in Jodhpur After Leh Arrest: Details Here

Web Summary : Activist Sonam Wangchuk was arrested following Leh violence and moved to Jodhpur jail under CCTV surveillance. Accused of inciting unrest after protests demanding regional autonomy turned violent, resulting in fatalities and injuries. Internet was suspended; many were arrested.
टॅग्स :ladakhलडाखCrime Newsगुन्हेगारी