इंदूरच्या राजा रघुवंशी हत्येनंतर बेपत्ता असलेल्या सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे. सोनमनेच बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीचा काटा काढल्याचं समोर आलं आहे. या घटनेने कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हत्या प्रकरणात सोनमसह चार जणांना अटक करण्याक आली असून नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.
सोनम आणि राजाच्या लग्नातला एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नातील एका विधीदरम्यान राजा सोनमला सिंदूर लावताना दिसत आहे. यामध्ये राजाच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत असून तो खूपच जास्त आनंदी आहे. मात्र सोनमचा चेहरा पडलेला पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नाहीत. त्यामुळेच ती या लग्नामुळे खूश नसल्याचं दिसून येत आहे.
५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा राजाच्या लग्नाचा हा व्हिडीओ पाहून सोनमला या लग्नात अजिबात रस नसल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तेव्हापासूनच सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शिलाँग पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने स्वतः राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला होता आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत संपूर्ण घटना घडवून आणली. तपासात असं दिसून आलं आहे की, सोनमचं राज कुशवाहवर खूप प्रेम होतं.
नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
सोनमने राजा रघुवंशीला मारण्यासाठी आधीच प्लॅनिंग केलं होतं. सोनम आणि राज यांनी त्यांच्या तीन मित्रांना आधीच गुवाहाटीला पाठवलं होतं. तिघांनी गुवाहाटीत एक अॅक्टिव्हा भाड्याने घेतली होती आणि रेकी केली होती. सोनम लोकेशन शेअर करत होती. आकाश, विशाल, आनंद आणि राज यांनी सोनमसोबत मिळून रघुवंशीची हत्या केली.