Sonali Phogat: सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 08:03 IST2022-08-31T08:03:18+5:302022-08-31T08:03:45+5:30

Sonali Phogat: टिकटॉक स्टार सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता.

Sonali Phogat: Sonali Phogat's wealth of 110 crores, daughter inherits the wealth | Sonali Phogat: सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार

Sonali Phogat: सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार

- बलवंत तक्षक 
चंडीगड : टिकटॉक स्टार सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता. यशोधरा यांच्या जिवाला धोका असून तिला सुरक्षा देण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. यशोधरा यांचे काका कुलदीप फोगाट यांनी सांगितले की, यशोधरा यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी आपण लवकरच पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार आहोत. यशोधरा हिला आता हॉस्टेलऐवजी घरीच ठेवण्यात येणार आहे.  सोनाली फोगाट यांच्या नावावर पती संजय यांच्या हिश्श्याची १३ एकर जमीन आहे. हिसारमध्ये सहा एकरमध्ये फार्म हाउस आणि रिसॉर्ट आहे. संतनगरमध्ये निवासस्थान आणि दुकान आहे. गुरुग्राममध्ये दोन फ्लॅट आहेत. यशोधरा ही २१ वर्षांपर्यंत नातेवाइकांच्या संरक्षणात राहील.

Web Title: Sonali Phogat: Sonali Phogat's wealth of 110 crores, daughter inherits the wealth