जिल्हा कबड्डी संघाच्या कर्णधारपदी सोनाली धोत्रे व गणेश वराडे

By Admin | Updated: June 2, 2014 08:55 IST2014-06-02T08:55:59+5:302014-06-02T08:55:59+5:30

नाशिक : दि. १ ते ५ जून दरम्यान बदलापूर (ठाणे) येथे होणार्‍या ४१व्या कुमार व कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्‘ाच्या कुमारी गटाच्या कर्णधारपदी रचना क्लबच्या सोनाली धोत्रे, तर कुमार गटाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळ सय्यद पिंप्रीच्या गणेश वराडे यांची निवड करण्यात आली.

Sonali Dhotre and Ganesh Varade as the captain of District Kabaddi team | जिल्हा कबड्डी संघाच्या कर्णधारपदी सोनाली धोत्रे व गणेश वराडे

जिल्हा कबड्डी संघाच्या कर्णधारपदी सोनाली धोत्रे व गणेश वराडे

शिक : दि. १ ते ५ जून दरम्यान बदलापूर (ठाणे) येथे होणार्‍या ४१व्या कुमार व कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्‘ाच्या कुमारी गटाच्या कर्णधारपदी रचना क्लबच्या सोनाली धोत्रे, तर कुमार गटाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळ सय्यद पिंप्रीच्या गणेश वराडे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कबड्डी संघाचा आशीर्वाद समारंभ शनिवार, दि. ३१ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील बागुल, मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. महेश सावंत, माजी उपमहापौर गुलाम शेख यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा संघाच्या खेळाडूंना आमदार जयंत जाधव यांच्या वतीने खेळाचा गणवेश देण्यात आले. दि. २६ ते ३१ मे दरम्यान संभाव्य १६ खेळाडूंचे सराव शिबिर यशवंत व्यायाम शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे जिल्‘ाच्या अंतिम कुमार व कुमारींचे संघ जिल्‘ाचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी जाहीर केले ते पुढीलप्रमाणे -
कुमार गट - गणेश वराडे (कर्णधार), सतीश ढिकले, भगवान ढिकले, जयेश देवरे, राजेंद्र मांढरे, ईश्वर टापरे, सुमीत डावखर, भरत भोर, गणेश कडाळे, अमोल घोटेकर, अक्षय देशमुख, व्यवस्थापक- विलास पाटील, प्रशिक्षक- प्रशांत भाबड.
कुमारी गट - सोनाली धोत्रे (कर्णधार), निकिता पवार, प्रणाली लहानगे, सोनाली वाझेकर, दीपाली दिवे, मानसी वाझट, श्रृती जाडर, संजना गायकवाड, समीरा सय्यद, हर्षाली मुळे, अश्विनी गायकवाड, शामल देशमुख. व्यवस्थापक- भक्ती वालझाडे, प्रशिक्षक- श्रद्धा वालझाडे.

(फोटो कॅप्शन)
नाशिक जिल्‘ाच्या कुमार व कुमारी संघाच्या आशीर्वाद समारंभाप्रसंगी सुनील बागुल, ॲड. महेश सावंत, गुलाम शेख, प्रशांत भाबड, विलास पाटील, शरद पाटील, भक्ती वालझाडे, श्रद्धा वालझाडे.

Web Title: Sonali Dhotre and Ganesh Varade as the captain of District Kabaddi team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.