धक्कादायक! मोमोज मागितले म्हणून वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 15:07 IST2018-05-28T15:07:04+5:302018-05-28T15:07:04+5:30

दारू प्यायलेल्या वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकलं.

Son asks for momos, drunk man throws him into canal | धक्कादायक! मोमोज मागितले म्हणून वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकलं

धक्कादायक! मोमोज मागितले म्हणून वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकलं

नवी दिल्ली- मुलाने मोमोज मागितले म्हणून दारू प्यायलेल्या वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. वडिलांनी मुलाला जैतपूर शेजारी असलेल्या आगरा कालव्यात फेकलं. 
संजय अल्वी (वय 31) असं आरोपी वडिलांचं नाव आहे. संजयचा मुलगा अयानचा रविवारी मृतदेह सापडला. रविवारी सकाळी 10.10 वाजता ही घटना उघडकीस आली. एक व्यक्ती मुलाला कालव्यात फेकून गेल्याचा फोन पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्वीला पकडलं. व अयानसाठी शोधमोहीम सुरू केली. 
चौकशीदरम्यान अल्वीने पोलिसांना सांगितलं की, मी व माझा मुलगा फिरत होतो. त्यावेळी अयान भूक लागली म्हणून रडायला लागला. तेव्हाच त्याला बाजूला असलेला मोमोजचा स्टॉल दिसला. अयानने मोमोजसाठी हट्ट केला. अल्वीने अयानला ओरडून गप्प करण्याचा प्रयत्न केला. पण तो गप्प झाला नाही. त्यामुळे चिडलेल्या अल्वीने अयानला पुलावरून खाली फेकलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कालव्याजवळ पोहचण्याआधी दारूची बाटली विकल घेतली होती व तो मुलासमोर दारू प्यायला. अल्वीच्या रक्तामध्येसुद्धा दारूचा मोठ्या प्रमाणात अंश सापडला आहे. 
मृत्यू झालेला मुलगा अयान हे अल्वीचं तिसरं अपत्य आहे. त्याला एक 11 वर्षांची मुलगी आहे तर 10 वर्षांचा मुलगा आहे. अल्वीचं 2004 साली लग्न झालं पण त्याची पत्नी त्याला 2012मध्ये सोडून निघून गेली. अल्वी त्याची आई व तीन मुलांबरोबर राहत होता. 
 

Web Title: Son asks for momos, drunk man throws him into canal