लेकाला ऑनलाइन गेमिंगचं व्यसन; कर्ज इतकं केलं की आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 14:32 IST2024-08-15T14:21:57+5:302024-08-15T14:32:29+5:30
२२ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन जुगारात घेतलेलं कर्ज फेडता न आल्याने पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

लेकाला ऑनलाइन गेमिंगचं व्यसन; कर्ज इतकं केलं की आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन जुगारात घेतलेलं कर्ज फेडता न आल्याने पती-पत्नीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ली. यू. महेश्वर रेड्डी (४५) आणि त्यांच्या पत्नीने मंगळवारी रात्री नांद्याला जिल्ह्यातील अब्दुल्लापुरम गावात त्यांच्या शेतात आत्महत्या केली आहे.
ऑनलाईन गेमिंगसाठी घेतलं कोट्यवधींचं कर्ज
आत्मकुरूचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर रमनजी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलाने घेतलेलं कोट्यवधी रुपयांचं कर्ज फेडता न आल्याने या जोडप्याने कीटकनाशक प्यायलं आहे"
पाच एकर जमीन विकली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश्वर रेड्डी यांनी दोन कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांची पाच एकर जमीन यापूर्वीच विकली होती. उर्वरित कर्जाची परतफेड करण्यासाठी स्थानिक न्यायालयात झालेल्या निर्णयानुसार त्यांनी कुटुंबाचं घर आणि इतर मालमत्ताही जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
कर्जाचा बोजा वाढल्याने आत्महत्येचा निर्णय
गेल्या सहा महिन्यांपासून पती-पत्नी नातेवाईकांकडे राहत होते, तर मुलगा हैदराबाद येथे राहत होता. सावकारांच्या वाढत्या दबावामुळे या जोडप्याला हे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याचं त्यांनी सांगितले.