शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Somnath Chatterjee Death Updates: हिंदुत्ववाद्याच्या घरी जन्मलेला कम्युनिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 10:56 IST

Somnath Chatterjee Death Updates : एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती वेगवेगळ्या घटनांनी, आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले असावे याचे काहीच उत्तर देता येत नाही.

मुंबई- एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती वेगवेगळ्या घटनांनी, आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले असावे याचे काहीच उत्तर देता येत नाही. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आयुष्य अशाच चढउतारांनी भरलेले होते. सोमनाथ हे एक कट्टर कॉम्रेड असले तरी त्यांचे वडील एन. सी. चॅटर्जी कट्टर हिंदू संस्कृतीवादी होते. हिंदू महासभेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.सोमनाथ यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी निर्मलचंद्र चॅटर्जी आणि वीणापाणी देवी यांच्यापोटी आसाममध्ये तेजपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलकाता व इंग्लंडमध्ये झाले. इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण झाल्यावर त्यांनी हायकोर्टात वकिली सुरू केली. १९६८ साली ते सीपीएमच्या संपर्कात आले व पुढील चाळीस वर्षे ते याच पक्षात राहिले. १९७१ साली ते पहिल्यांदा निवडून गेले. ते सलग १० वेळा लोकसभेत निवडून गेले होते. 

२००४ साली डाव्या पक्षांच्या मदतीने संपुआ सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्यांना लोकसभेचे संचालन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्याला विरोधकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र या लोकसभेच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष संपण्याआधीच चॅटर्जी यांना त्यांच्याच पक्षाने नाकारले. सलग ४० वर्षे ज्या पक्षाचे काम केले त्याच पक्षाने राजकीय कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात नाकारणे चॅटर्जी यांना मोठा धक्का देणारे होते. राजकीय निवृत्तीनंतरही ते अनेक विषयांवर आपली मते मांडत होते.भारतीय संसदेच्या इतिहासात त्यांचे नाव एक आदर्श संसदपटू म्हणून नेहमीच घेतले जाईल यात शंका नाही. सोमनाथ चॅटर्जी यांच्या निमित्ताने लोकसभेच्या सभापतीपदी पहिल्यांदाच डाव्या पक्षाच्या सदस्यांना संधी मिळाली होती. तत्पूर्वी काँग्रेस, जनता पक्ष सारख्या राष्ट्रीय पक्षांच्या सदस्यांना या पदाची संधी मिळाली होती, तेलगू देसम, शिवसेना यांचेही सदस्य सभापती झाले होते. मात्र चॅटर्जी यांच्या रूपाने प्रथमच डाव्या पक्षाचे खासदार या पदावर बसत होते. भारतीय लोकशाहीच्या सर्वसमावेशकतेचे हे एक चांगले उदाहरण मानता येईल.

टॅग्स :Somnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जीlok sabhaलोकसभा