शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मैकदा तो मेरी बस्ती के कई घर पी गया... दारुसाठीची गर्दी पाहून कुमारांची 'सॅड शायरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:11 IST

लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कर्नाटकात सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. दरम्यान, दारूची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कर्नाटकातील हुबळीमध्ये एका दारूच्या दुकानाबाहेर सकाळी सात वाजताच लोकांनी रांगा लावल्या होत्या. तर, राजधानी दिल्लीतही हीच परिस्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर कवी आणि आम आदमी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते डॉ. कुमार विश्वास यांनी ट्विट करुन शायरीतून नाराजी व्यक्त केली आहे. 

लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच,  प्रत्येक जण मास्क लावून किंवा चेहरा झाकून दारू खरेदी साठी येईल. दरम्यान, काही ठिकाणी दारूच्या दुकानासमोर सोशल डिस्टंसिंगसाठी आखण्यात आलेल्या सर्कलवर लोक उभे असल्याचे दिसून येत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती दिसत आहे. दारुच्या दुकानाबाहेर लोकांची रांग लागली असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तर, पोलीस यंत्रणांवरही ताण पडल आहे. या रांगा पाहून डॉ. कुमार विश्वास यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

कुमार यांनी मैराज फैदाबादी यांची शायरी ट्विट करत दारु दुकानाबाहेर लागलेल्या रांगांबद्दल मत व्यक्त केलंय. 

मैकदे में किसने कितनी पी ख़ुदा जाने मगर,मैकदा तो मेरी बस्ती के कई घर पी गया..!”

अशी आशयपूर्ण शायरी ट्विट करुन कुमार विश्वास यांनी दारुमुळे गोरगरीब आणि गरिब वस्तीतील कुटुंबीयांची व्यथा आपल्या शब्दातून मांडली आहे. दारुसाठी लागलेली रांग हे नक्कीच निराशावादी चित्र असल्याचे विश्वास यांनी आपल्या ट्विटमधून सूचवलंय. 

दरम्यान, अनेक दारूच्या दुकानांबाहेर पोलीस सुद्धा तैनात आहेत. गर्दीमुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू नये, यासाठी दारूच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टंसिंगचे पालन लोकांकडून होत आहे की, नाही यावर पोलीस नजर ठेवून आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीPuneपुणेKarnatakकर्नाटकTwitterट्विटर