शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 22:07 IST

अनुज सुद यांचे शालेय शिक्षण पंजाब पब्लिक स्कूल, नाभा येथून झाले. शाळेत ते अत्यंत हुशार होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये अनुज यांची निवड झाली होती. मात्र, त्यांनी आयआयटीचा मार्ग सोडून एनडीएचा मार्ग निवडला होता.

ठळक मुद्देमेजर अनुज यांचे वडील सीके सूद हे लष्करात ब्रिगेडियर होते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये (आयआयटी) अनुज यांची निवड झाली होतीअनुज सूद यांची छोटी बहीण सैन्यात आहे

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवानांना हौतात्म्य आले. या चकमकीत हौतात्म्य आलेल्या जवानांतील एक नाव म्हणजे मेजर अनुज सूद. मेजर अनुज हे ब्रिगेड ऑफ गार्ड्सचे अधिकारी होते. या वीर अधिकाऱ्याचे भारतीय लष्कराशी फार जुनेच नाते होते. त्यांचे वडील सीके सूद हे  लष्करात ब्रिगेडियर होते. मेजर अनुज हे हरियाणातील पंचकुला येथील होते.

अनुज सुद यांचे शालेय शिक्षण पंजाब पब्लिक स्कूल, नाभा येथून झाले. शाळेत ते अत्यंत हुशार होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये (आयआयटी) अनुज यांची निवड झाली होती. मात्र, त्यांनी आयआयटीचा मार्ग सोडून एनडीएचा मार्ग निवडला होता.

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

एनडीएमध्ये मेजर सूद यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. ते 6 वेळा शिस्त आणि इंटेलिजन्समुळे अव्वल ठरले. इन्फंट्रीमॅन असूनही त्यांनी आयआयएससी बंगळुरू येथून एमटेक केले. यात ते डिस्टिंक्शनमध्येही आले होते.

2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह -मेजर अनुज सूद यांचा विवाह 2 वर्षांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील आकृती यांच्याशी झाला होता. सध्या त्यांना कुठलेही मूल नाही. मेजर सूद यांची पत्नी पुण्यातील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत आहे. मेजर अनुज यांचे वडील ब्रिगेडियर सीके सूद अमरावती एन्क्लेवमध्ये राहतात. 

बहीणही सैन्यात -मेजर अनुज यांची आई सुमन या यमुनानग येथील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांची एक मोठी बहीण ऑस्ट्रेलियात राहते. तर छोटी बहीण सैन्यात आहे.

CoronaVirus News : 'या'मुळे घेण्यात आला 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय, नीती आयोगाने सांगितले 'असे' कारण

पंचकुला येथेच होईल अंत्यविधी -

सूद कुटुंबीय 8 महिन्यांपूर्वीच पंचकुला येथील अमरावती एन्क्लेवमध्ये राहण्यासाठी आले होते. मेजर अनुज यांचे पार्थिव सोमवारीच पंचकुला येथे पोहोचेल. येथील मनीमाजरा येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानnda puneएनडीए पुणेSoldierसैनिकTerror Attackदहशतवादी हल्लाMartyrशहीद