"काही लोकांना रडत...", तामिळनाडूत पंतप्रधान मोदींचा एमके स्टॅलिन यांच्यावर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:10 IST2025-04-06T17:09:45+5:302025-04-06T17:10:35+5:30

मोदी म्हणाले, "२०१४ पूर्वी रेल्वे प्रकल्पासाठी दरवर्षी केवळ ९०० कोटी रुपये मिळत होते. या वर्षी, तामिळनाडूचे रेल्वे बजेट ६,००० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे आणि भारत सरकार येथील ७७ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण देखील करत आहे. यांत रामेश्वरम रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे."

some people having crying habit; PM Modi direct attack on MK Stalin in Tamil Nadu | "काही लोकांना रडत...", तामिळनाडूत पंतप्रधान मोदींचा एमके स्टॅलिन यांच्यावर थेट निशाणा

"काही लोकांना रडत...", तामिळनाडूत पंतप्रधान मोदींचा एमके स्टॅलिन यांच्यावर थेट निशाणा

विकसित भारताच्या प्रवासात तामिळनाडूची मोठी भूमिका आहे. तामिळनाडूची ताकद जेवढी वाढेल, तेवढाच भारताचा विकासही वेगवाने होईल. गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी २०१४ च्या तुलनेत तिप्पट अधिक पैसे दिला आहे. असे असताननाही काही लोकांना विनाकारण रडत राहण्याची सवय असते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील डीएमके सरकार आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला. ते रविवारी तमिळनाडूत एका सभेत बोलत होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम येथील रामनाथपुरममध्ये न्यू पंबन ब्रिजचे उद्घाटन केले.

मोदी म्हणाले, "२०१४ पूर्वी रेल्वे प्रकल्पासाठी दरवर्षी केवळ ९०० कोटी रुपये मिळत होते. या वर्षी, तामिळनाडूचे रेल्वे बजेट ६,००० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे आणि भारत सरकार येथील ७७ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण देखील करत आहे. यांत रामेश्वरम रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे."

भारतीय अर्थव्यवस्था दुपटीने वाढली -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या १० वर्षात भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट केला आहे. एवढ्या जलद वाढीचे एक रमुख कारण म्हणजे, आपली उत्कृष्ट आधुनिक पायाभूत सुविधा. गेल्या १० वर्षांत, आपण रेल्वे, रस्ते, विमानतळ, बंदरे, वीज, पाणी, गॅस पाइपलाइन यांसारख्या पायाभूत सुविधांसाठीचे बजेट जवळजवळ ६ पट वाढवले ​​आहे."

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र सुरू आहे मेगा प्रोजेक्ट्सवर काम -
देशातील मेगा प्रोजेक्ट्सवर बोलताना मोदी म्हणाले, "आज देशात मेगा प्रोजेक्ट्सची कामे अत्यंत झपाट्याने सुरू आहे. जर आपण उत्तरेकडे गेलात तर, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रीज पैकी एक, 'चिनाब ब्रिज', जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधला गेला आहे. जर आपण पश्चिमेकडे गेलो तर मुंबईत देशातील सर्वात लांब समुद्री पूल 'अटल सेतू' बांधला गेला आहे. जर आपण पूर्वेकडे गेलात तर, आपल्याला आसामचा 'बोगीबील ब्रिज' दिसेल आणि आपण दक्षिणेकडे आलात तर, जगातील काही मोजक्या व्हर्टिकल लिफ्ट ब्रिजपैकी एक असलेल्या 'पंबन ब्रिज' दिसेल. त्याचेही काम पूर्ण झाले आहे."

Web Title: some people having crying habit; PM Modi direct attack on MK Stalin in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.