शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sologamy Marriage: देशभरातून प्रचंड विरोध झाला, पण गुजरातच्या 'त्या' मुलीने अखेर स्वतःशी लग्न केलेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 10:35 IST

Sologamy Marriage: स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले. 11 जून रोजी तिचे लग्न होणार होते, पण लग्नात कोणी व्यत्यय आणू नये, यासाठी तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले.

वडोदरा: स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या गुजरातच्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले. क्षमाने 11 जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती, मात्र देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले.

सर्व रितीरिवाजांनुसार लग्नक्षमा बिंदूने स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळ्यात स्वतःशी लग्नगाठ बांधली. लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहेंदी सेरेमनीदेखील झाली. वडोदराच्या गोत्री येथील घरात क्षमाने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. मात्र, या लग्नात मुलगा किंवा लग्न लावणारा पंडित नव्हते. कुठलाही गाजावाजा न करता क्षमाने कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि काही खास मित्रांच्या उपस्थिती लग्न केले.

वाद होऊ नये म्हणून बदलली तारीख भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे. क्षमाने यापूर्वी 11 जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी विरोध केला होता. यातच कोणीतरी 11 जून रोजी तिच्या घरी येऊन वाद निर्माण करेल, यासाठी तिने तीन दिवस आधी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

मंदिरात लग्न करण्याला विरोधक्षमाने आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप नेत्याच्या विरोधानंतर त्यांनी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही अशाप्रकारच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. लग्न लावणाऱ्या पंडितानेही अशा एकल लग्न किंवा स्व-विवाहाचा विधी करण्यास नकार दिला. यानंतर क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

असा निर्णय का घेतला? स्वतःशी लग्न करण्याबाबत क्षमाने सांगितले की, तिला लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती, पण वधू बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमा बिंदू एका खासगी कंपनीत नोकरी करते. ‘स्व-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे,  म्हणून मी स्वतःशीच लग्न केलंय,’असे क्षमा म्हणाली.

हनिमूनसाठी गोव्याला!क्षमाचे आई-वडील खुल्या विचारांचे आहेत, या निर्णयास त्यांचाही पाठिंबा आहे. त्यांनी लग्नात क्षमाला आशीर्वादही दिला. आता लग्नानंतर ती हनिमूनला गोव्याला जाणार आहे. देशात ‘सोलो लग्न’ करणारी ती पहिलीच मुलगी असावी, असेही तिने सांगितले.

टॅग्स :Gujaratगुजरातmarriageलग्नBJPभाजपाcongressकाँग्रेस