पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; 4 दिवसात 4 भारतीय जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 10:43 IST2018-11-13T10:41:26+5:302018-11-13T10:43:29+5:30

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

soldier killed in pakistan sniper attack along loc poonch area | पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; 4 दिवसात 4 भारतीय जवान शहीद

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; 4 दिवसात 4 भारतीय जवान शहीद

नवी दिल्ली: पाकिस्तानी सैनिकांच्या जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील कुरघोड्या सुरुच आहेत. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे. यामध्ये गेल्या 4 दिवसात 4 जवान शहीद झाले आहेत. 

शनिवारी आणि रविवारी काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमध्ये दोन भारतीयांना वीरमरण आलं. या गोळीबाराच्या एक दिवस आधी अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला होता. काल संध्याकाळी पुन्हा पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. यामध्ये एक जवान शहीद झाला, तर एक जवान जखमी झाला. 

रविवारपर्यंत तीन स्नायपर हल्ले
रविवारी राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये केशव सोमगीर यांना वीरमरण आलं. ते नाशिकच्या श्रीरामपूरचे रहिवासी होते. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येतंय. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. 
 

Web Title: soldier killed in pakistan sniper attack along loc poonch area