धोका! नवऱ्याने वर्तमानपत्र, भाजी विकून बायकोला केलं शिक्षिका, ती गेली शेजाऱ्यासोबत पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:08 IST2025-03-28T11:07:41+5:302025-03-28T11:08:13+5:30
सरकारी नोकरी मिळाल्यानंतर ती तिचा नवरा आणि मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत पळून गेली. प

धोका! नवऱ्याने वर्तमानपत्र, भाजी विकून बायकोला केलं शिक्षिका, ती गेली शेजाऱ्यासोबत पळून
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील केनगर पोलीस स्टेशन परिसरात एका पतीची त्याच्या पत्नीने फसवणूक केली. पत्नी शिक्षिका म्हणून काम करत होती. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर ती तिचा नवरा आणि मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत पळून गेली. पतीने वर्तमानपत्रं आणि भाजी विकून पत्नीला शिक्षिका बनवलं होतं. त्याला आशा होती की, आता त्याच्या घरात सर्वकाही चांगलं होईल, पण भलतंच घडलं आहे.
पत्नीने धोका दिल्यावर दुःखी झालेल्या पतीने न्यायासाठी डीईओ, डीएम आणि पोलीस ठाण्यात दाद मागितली आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी शिक्षिका म्हणून काम करते. ती शाळेजवळच भाड्याच्या घरात राहत होती. पत्नी शेजारी राहणाऱ्या सुनील रामसोबत पळून गेली. तीन दिवस झाले गेले तरी तिचा पत्ता लागलेला नाही.
पत्नीने २००८ मध्ये शिक्षिका होण्यासाठी अर्ज केला होता. परंतु त्या वर्षी तिची निवड होऊ शकली नाही. यानंतर उच्च न्यायालयात ते लढले आणि जिंकले. न्यायालयाच्या २०१८ मध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली. शिक्षिका झाल्यानंतरही पत्नीला अनेक महिने पगार मिळाला नाही. तेव्हा पती सकाळी वर्तमानपत्र आणि दिवसभर भाज्या विकून पत्नी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.
कर्जाचा बोजा खूप वाढला. तेव्हा पतीने बँकेकडून कर्ज घेऊन आणि मित्रांकडून पैसे घेऊन घर चालवलं. मात्र आता पत्नीनेच धोका दिल्याने तो खूप हताश झाला आहे. त्याला मोठा धक्का बसला आहे. शाळेचे मुख्याध्यापक राकेश कुमार यांनी शिक्षिका कामावर येत नसल्याचं म्हटलं आहे. ती शेजाऱ्यासोबत पळून गेल्याने गावात याची जोरदार चर्चा रंगली आहे.