सोयको किलर -- जोड

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:25+5:302015-02-18T23:54:25+5:30

हा आरोपी मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाराद्वारी तलाव या घटनास्थळाच्या परिसरात सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलजवळ संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची स्कूल बॅग लटकलेली होती. पोलिसांनी ही बॅग तपासली असता त्यांना रक्ताने माखलेला चाकू आणि रक्ताने भरलेले कपडे आढळून आले होते. लागलीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाराद्वारी तलावाजवळील खुनात अटक केली.

Soko Killer - Pair | सोयको किलर -- जोड

सोयको किलर -- जोड

आरोपी मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाराद्वारी तलाव या घटनास्थळाच्या परिसरात सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलजवळ संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची स्कूल बॅग लटकलेली होती. पोलिसांनी ही बॅग तपासली असता त्यांना रक्ताने माखलेला चाकू आणि रक्ताने भरलेले कपडे आढळून आले होते. लागलीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाराद्वारी तलावाजवळील खुनात अटक केली.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस.एम. बंडीवार यांनी आरोपीला बुरख्यात न्यायालयात हजर करून त्याचा २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.

खुनांमागील हेतू काय ?

लागोपाठ तिन्ही युवकांचा निघृर्ण खून करण्यामागे आरोपीचा हेतू काय, त्यासंबंधाने सखोल तपास करणे आहे. अनोळखी मृतदेहांची ओळख करणे आहे, खुनानंतर आरोपीने मृताच्या अंगावरील कपडे काढून ठेवले आहेत, ते कोठे लपवून ठेवले, ते हुडकून काढून जप्त करणे आहे. खून करण्यासाठी आरोपीने साथीदारांची मदत घेतली असावी, त्यांचा शोध घेणे आहे. खून करण्यासाठी आरोपीने चाकूव्यतिरिक्त इतर शस्त्र आणि साधनांचा वापर केला असावा, त्या संबंधाने तपास करणे आहे. या महत्वाच्या मुद्यांवर आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला.

तो काहीही बोलत नाही

या तिन्ही खुनाच्या संदर्भात हा आरोपी काहीही बोलत नाही. एक प्रश्न विचारल्यानंतर मोठ्या मुश्किलीने दहा-पंधरा मिनिटानंतर तो उत्तर देतो, असे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले.

सरकारने नेमला वकील

पोलीस कोठडी रिमांडदरम्यान या आरोपीची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लिगल एडमार्फत ॲड. निशा भावसागर यांची नेमणूक करण्यात आली. पोलीस कोठडी रिमांडला विरोध करताना त्या म्हणाल्या, आरोपी हा पोलीस कोठडीतच आहे आणि हा कालावधी पुरेसा आहे. या प्रकरणात चुकीने आरोपीला गोवण्यात आले, असेही त्या म्हणाल्या. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: Soko Killer - Pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.