शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

ट्विटरनं भारताचा चुकीचा नकाशा हटवला, मॅपमध्ये देशाबाहेर दाखवले होते जम्मू-काश्मीर अन् लडाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 22:46 IST

ट्विटरच्या या कृत्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली होती आणि कारवाईसाठी तथ्य एकत्रित करण्याचे आदेशही दिले होते. यानंत दबाव वाढत असल्याने ट्विटरला चुकीचा नकाशा हटवावा लागला आहे.

नवी दिल्ली - ट्विटरने आपल्या साईटवरील भारताचा चुकीचा नकाशा हटवला आहे. आधी ट्विटरने आपल्या वेबसाइटवर टाकलेल्या नकाशात लडाख आणि जम्मू काश्मीर वेगळे देश म्हणून दर्शवले होते. ट्विटरच्या या कृत्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली होती आणि कारवाईसाठी तथ्य एकत्रित करण्याचे आदेशही दिले होते. यानंत दबाव वाढत असल्याने ट्विटरला चुकीचा नकाशा हटवावा लागला आहे. (Social media platform twitter remove wrong map of india)

चुकीचा नकाशा दाखविणे हा भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघण होते. यावर सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. ट्विटरकडून एका ट्विटमध्ये फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यात भारताचा नकाशाही दाखवला आहे. त्याशिवाय आणखी काही देशांचे नकाशे आहेत. परंतु कोणतेही नकाशे चुकीचे नाहीत. केवळ भारताच्या नकाशासोबतच ट्विटरवर फेरफार करण्यात आली आहे. भारताच्या नकाशात देशाचे शीर म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळा देश असल्याचे ट्विटरने दाखवले आहे. ट्विटरच्या या प्रकाराची सरकारकडूनही दखल घेण्यात आली आहे.ट्विटरने कुठे दाखवला होता हा नकाशा - ट्विटरच्या वेबसाइटवर एक करिअर नावाचे पेज आहे. यातच त्यांनी त्यांचे अधिकारी कोठे-कोठे कार्यरत आहेत, हे दाखवले होते. यात भारतात तीन ठिकाणं दर्शविण्यात आली आहेत. यात दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. यातच हा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे. 

पहिल्यांदाच चूक नाही, सात महिन्यात पुन्हा घडला प्रकार -पहिल्यांदाच ट्विटरकडून अशाप्रकारचे कृत्य झाले असे नाही, तर याआधीही 12 नोव्हेंबरला असे घडले होते. त्यावेळी लडाख हा चीनचा भाग असल्याचे ट्विटरने दाखविले होते. त्यावेळी सरकारकडून ट्विटरबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या. तेव्हा ट्विटरने लेखी स्वरुपात माफी मागितली होती. त्या माफीनाम्यात ट्विटरने म्हटले होते की, भविष्यात अशाप्रकारे चूक होणार नाही. परंतु सात महिन्याच्या कालावधीतच ट्विटरने भारताचा असा नकाशा दाखवून मोठी चूक केली.

टॅग्स :Twitterट्विटरIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाख