शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया कंपन्या नरमल्या; फेसबुक, व्हॉट्स-ॲप नियम पाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:25 IST

अधिकारी नियुक्तीचा तपशील केंद्र सरकारला केला सादर

नवी दिल्ली :  माहिती-तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी यांच्या नियुक्तीविषयीची तपशीलवार माहिती गुगल, फेसबुक, व्हॉट्स-ॲप यासारख्या समाजमाध्यम कंपन्यांनी केंद्र सरकारला सादर केली. मात्र, ट्विटरने अद्याप मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नसल्याने ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील बेबनाव कायम असल्याचे चित्र आहे. माहिती-तंत्रज्ञानविषयक नवे नियम २६ मेपासून अंमलात आले. नव्या नियमानुसार सर्व समाजमाध्यम कंपन्यांना भारतात मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करून त्यासंदर्भात केंद्र सरकारला अवगत करणे क्रमप्राप्त होते. केंद्र सरकारने सर्व कंपन्यांना या नियुक्त्यांबाबतचा तपशील तात्काळ सादर करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार गुगल, फेसबुक, व्हॉट्स-ॲप, कू, टेलिग्राम, लिंक्डइन आणि शेअरचॅट या समाजमाध्यम कंपन्यांनी सर्व माहिती केंद्र सरकारकडे शुक्रवारी सायंकाळी सुपूर्द केली. दरम्यान, व्हॉट्सॲपने नव्या नियमांविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली असली तरी त्यांनी नियमांचे पालन करत असल्याचे केंद्र सरकारला कळवल्याने व्हॉट्सॲप आणि केंद्र सरकार यांच्यात निर्माण झालेला वाद निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत.ट्विटरसोबत बेबनाव कायमकाँग्रेसच्या कथित टूलकिट प्रकरणावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच नव्या नियमांबाबत ट्विटरने नाराजी व्यक्त करत त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात येत असल्याचे नमूद केले. त्यानंतर केंद्र सरकारनेही ट्विटरला फटकारत नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. ट्विटरने भारतातील एका लॉ फर्ममधील वकिलाची नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचा संदेश केंद्र सरकारला पाठवला. मात्र, मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची ट्विटरने नियुक्ती केलेली नाही.

नव्या नियमांनुसार संबंधित नोडल अधिकारी तसेच तक्रार निवारण अधिकारी त्या समाजमाध्यम कंपनीचे कर्मचारी असण्याबरोबरच भारतीय नागरिकही असावेत, असे सांगितले आहे. मात्र, ट्विटरने हा नियमही पाळलेला नसल्याचे दिसून येत आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटरWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप