शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

…म्हणून मुलांनीच वयोवृद्ध वडिलांची केली तुरुंगात रवानगी, असा रचला कट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 19:53 IST

Uttar Pradesh Crime News: आजच्या काळात पैशांची हाव वाढली की माणसं नातेसंबंधांनाही विसरून जातात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे राहणाऱ्या १०३ वर्षांच्या गुरदीप सिंग या वयोवृद्ध शेतकऱ्याची त्यांच्याच मुलांनी तुरुंगात रवानगी केली.

आजच्या काळात पैशांची हाव वाढली की माणसं नातेसंबंधांनाही विसरून जातात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे राहणाऱ्या १०३ वर्षांच्या गुरदीप सिंग या वयोवृद्ध शेतकऱ्याची त्यांच्याच मुलांनी तुरुंगात रवानगी केली. आपले वडील त्यांची ५  एकर जमीन गुरुद्वाराला दान करतील या भीतीने त्यांच्या दोन मुलांनी त्यांना कटकारस्थान रचून तब्बल १९ महिने तुरुंगात ठेवले. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार २०१८ मध्ये गुरदीप सिंग यांचं कुटुंब एका कौटुंबिक वादात फसलं होतं. तसेच हत्येच्या प्रयत्नाच्या एका प्रकरणात  गुरदीप आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक झाली होती. मात्र त्यांना जामीन मिळाला होता. तसेच कोर्टामध्ये खटला सुरू होता. दरम्यान, गुरदीप सिंग यांचे दोन मुलगे कमलजीत आमि हरप्रीत यांनी एक कट रचला. त्यांनी गुरदीप यांना हा खटला निकालात निघाला असून, कोर्टात जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. तर हे दोघेही मात्र गुपचून सुनावणीदिवशी हजर राहू लागले.

अनेक तारखांना अनुपस्थित राहिल्यानंतर गुरदीप सिंग यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं. तसेच ऑगस्ट २०२२ मध्ये अटक करून तुरुंगात पाठवलं. तिथे गुरदीप सिंग यांनी त्यांची व्यथा तुरुंग अधीक्षकांना सांगितली. मला कोणी भेटायला येत नाही. तसेच थंडीपासून बचावासाठी माझ्याकडे कपडे आणि पगडीही नाही, असे सांगितले. त्यानंतर तुरुंग अधीक्षकांनी एका एनजीओकडे मदत मागितली. 

या एनजीओने गुरदीप सिंग यांना आवश्यक वस्तू पुरवल्या. सोबतच त्यांच्या जामिनाची व्यवस्था केली. हे वृत्त ऐकून त्यांचे दोन्ही मुलगे घाबरले. त्यांनी जामिनाला विरोध केला. तसेच स्वत: जामीन राहण्यास तयार असल्याचे सांगितले, मात्र त्यांनी वडिलांना जामीन मात्र दिला नाही. अखेरीस तीन महिन्यांनंतर कोर्टाने हस्तक्षेप करून गुरदीप सिंग यांना मुक्त केलं. आता ते एका एका एनजीओच्या देखरेखीखाली आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार