शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

हिमाचलच्या पर्वतांमधून 'या' राज्यांत येतंय मोठं संकट, वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 14:33 IST

त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांत हिमाचल प्रदेशात एकूण बर्फाचे प्रमाण 0.72 टक्क्यांनी कमी झाले आहे.

हिमालय पर्वतातून बर्फ वेगाने वितळत असल्यानं शास्त्रज्ञांनी हिमाचल प्रदेश राज्यासह इतर राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. कारण हिमालयातील बर्फ अधिक वेगाने वितळल्यास भविष्यात पाण्याचे मोठे संकट उद्भवू शकते, असा इशारा हिमाचल हवामान बदल केंद्राच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांत हिमाचल प्रदेशात एकूण बर्फाचे प्रमाण 0.72 टक्क्यांनी कमी झाले आहे.हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वैज्ञानिकांनी सांगितले की, हिमाचलमध्ये सन 2018-19मध्ये बर्फाचे आवरण 20,210 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त होते. जे 2019-20 मध्ये 20,064 चौरस किलोमीटरपर्यंत घसरले आहे. याचा थेट परिणाम हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या राज्यात राहणा-या लोकांवर होणार आहे. उन्हाळ्यात नद्यांच्या प्रवाहावर बर्फाच्या निरंतर घटाचा परिणाम होतो. तज्ञांच्या मते, वेगाने बर्फ वितळण्यामुळे आगामी काळात पाण्याची कमतरता भासू शकते. हिमाचलच्या या नद्यांमधून ज्या राज्यांमध्ये पाणी जाते त्या राज्यांसाठी प्रचंड संकट ओढवेल.  पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर.हवामान बदल केंद्राने राज्यात हिमवृष्टीचे क्षेत्र तयार केले असून, त्याचा अभ्यास केला आहे. या अहवालात, व्यास आणि रावी नदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास केला गेला. तर येथे असे दिसून आले की, येथे हिमवर्षावात लक्षणीय घट झाली आहे. सतलज खो-यात तुलनेने जास्त बर्फ पडलेला दिसत आहे. एप्रिलमध्ये चिनाब खो-यात एकूण 87 टक्के पाऊस हिमवर्षावात होतो. तर मेमध्ये तो कमी होऊन 65 टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच चिनाब खो-यात 22 टक्के हिमवृष्टी झाली. ऑगस्टमध्ये हे बर्फ आणखी वितळणे अपेक्षित आहे.एप्रिलमध्ये व्यास खो-यातील 49 टक्के भाग बर्फाने व्यापलेला आहे. मेपर्यंत ते 45 टक्के एवढा तो झाला आहे. म्हणजेच व्यास नदीच्या पाणलोट क्षेत्रात चार टक्के बर्फ कमी झाला आहे. एप्रिलमध्ये रावी खोरे 44 टक्के होते, जे मेमध्ये घटून ते 26 टक्क्यांवर आले आहे. म्हणजे 18 टक्के बर्फ वितळला आहे.  ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदलामुळे हिमाचलच्या हिमालयातील पर्वतरांगांमधील बर्फ वेगाने वितळत आहे. 

हेही वाचा

अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन

रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख

टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश