एसएमटीच्या बसला नाहीत टायर
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:36+5:302015-07-10T23:13:36+5:30
सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेतून एसएमटीकडे (मनपा परिवहन) नव्या कोर्या बस आल्या असल्या तरी जुन्या बसची वाट लागली आहे. जुन्या बस चार टायरवर धावत असून, रस्त्यातच बंद पडत आहेत.

एसएमटीच्या बसला नाहीत टायर
स लापूर : केंद्र शासनाच्या योजनेतून एसएमटीकडे (मनपा परिवहन) नव्या कोर्या बस आल्या असल्या तरी जुन्या बसची वाट लागली आहे. जुन्या बस चार टायरवर धावत असून, रस्त्यातच बंद पडत आहेत. नव्या बसचा ताफा आल्याने ग्रामीण हद्दीत ४0 किमी घुसखोरीची तयारी करणार्या एसएमटीची अवस्था बिकट होणार आहे हे आत्तापासूनच जाणवू लागले आहे. जुन्या बसचे टायर झिजले असून, रिमोल्ड करण्यासाठी पैसे नाहीत अशी स्थिती झाली आहे. चार चाकावर बस धावू लागल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ज्ञानेश्वरनगरकडे (बस क्र. ४७) जाणारी बस मागील दोन्ही टायर फुटल्याने जानकीनगरजवळ बंद पडली. यामुळे सकाळी शाळेला जाणार्या मुलांचे हाल झाले. बसची पाहणी केल्यावर मागील टायरची मोठ्या प्रमाणावर झीज झाल्याने ट्यूब बस्ट झाल्याचे दिसून आले. मागील दोन टायरपैकी एकाच झिजलेल्या टायरवर बस निघाली होती. ही बस दुरुस्त होण्यास दुपार झाली. जुळे सोलापुरातील अनेक नगरात बससेवा सुरू झालेली नाही. नवीन मार्ग बसच्या प्रतीक्षेत आहेत. नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.