Smriti Irani Corona Positive; request to those who come in contact for Covid test | स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना हात जोडून विनंती

स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना हात जोडून विनंती

नवी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. 


याची घोषणा करताना मला शब्द सापडत नाहीत. परंतू मी सोप्या शब्दांत सांगते - मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली कोरोना चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी, ही हात जोडून विनंती करते, असे ट्विट इराणी यांनी केले आहे. 
कोरोनाचा विळखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळालाही बसला आहे. गेल्या महिन्यात गृह मंत्री अमित शहा यांनादेखील कोरोना झाला होता. तसेच अन्य मंत्र्यांनादेखील कोरोना झाला होता. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे दिल्लीत निधन झाले होते. त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याशिवाय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी कोरोनाची लागण झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनाही कोरोनाची लागण झाली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Smriti Irani Corona Positive; request to those who come in contact for Covid test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.