शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 06:41 IST

'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांना अधिक जागा देण्याबाबत आघाडीतील प्रमुख पक्ष असलेली काँग्रेस सकारात्मक नसल्याने हा विषय लांबल्याचे चित्र आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असल्याचा दावा आघाडीतील नेते करीत असले तरी हा विषय ताणलेलाच असल्याचे दिसत आहे. 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांना अधिक जागा देण्याबाबत आघाडीतील प्रमुख पक्ष असलेली काँग्रेस सकारात्मक नसल्याने हा विषय लांबल्याचे चित्र आहे. या आघाडीत काँग्रेसशिवाय उद्धवसेना तसेच शरद पवार गट हे दोन प्रमुख पक्ष असले तरी मविआच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे समाजवादी पक्ष, भाकप, माकप, पीडब्लूपी व इतर छोटे पक्षही आहेत. सपाने मविआकडे १२ जागांची मागणी केली आहे. तर, माकपनेही ८ ते ९ जागा मागितल्या आहेत. भाकपनेही ३ ते ४ जागा मागितल्या आहेत. 

माकप व शेतकरी कामगार पक्षाचा राज्य विधानसभेत सध्या प्रत्येकी एक आमदार आहे. डाव्या पक्षांना अधिक जागा दिल्या तर मविआ अधिक भक्कम होईल, असा दावा केला जात आहे. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव मुंबईत असून मविआतील घटक पक्षांशी चर्चेतून सकारात्मक तोडगा काढण्याच्या दिशेने चर्चा झाली आहे. २८८ पैकी २६० जागावाटपावर अंतिम निर्णय झाला असल्याचे मानले जात आहे. अखिलेश यादव यांची शुक्रवारी मालेगावमधील सभा तसेच धुळ्यात शनिवारी होत असलेल्या जाहीर सभा सपाच्या तयारीचेच द्योतक मानले जाते. राज्यातील काही ठराविक मतदारसंघांसाठी सपाने अगोदरच आपले उमेदवार निश्चित केले आहेत.

 लोकसभेत होता फक्त ०.४% मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुतीत मतांचा फरक फक्त ०.४% होता. आघाडीला ४४% तर महायुतीला ४३.६% मते पडली होती. लोकसभेत भाजपला पराभूत करण्यासाठी माकपने जागेचा आग्रह धरला नव्हता. आता त्याची महाविकास आघाडीकडून परतफेड करण्याची वेळ असल्याचे माकपने म्हटले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोले